उपसरपंच निवडीत बंजारा तांडा येथे अनेपक्षित निकाल तर इतर चार ठिकाणी उपसरपंच निवड शांततेत!

माहूर:- नुकत्याच संपन्न झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत थेट जनतेतून निवडून आलेल्या लोकनियुक्त सरपंचाच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उपसरपंच निवडणुकीत बंजारा तांडा येथे अनेपेक्षित निकाल लागले तर पानोळा, वानोळा, ईवळेश्वर, मालवाडा येथे अपेक्षित असलेल्या पॅनल चे उपसरपंचाची निवड झाली आहे.
वानोळा येथे सरपंच सुनीताबाई  सिडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या झालेल्या सभेत अभिजीत राठोड यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली, तर पानोळा येथे सरपंच रमेश कुडमिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत कुमिका राम पवार यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली. इवळेश्वर येथे सरपंच वंदना दुधराम राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत कमलाबाई जाधव यांच्या गळ्यात उपसरपंचाची माळ पडली.बंजारा तांडा येथे मात्र अनपेक्षित निकाल लागले.
नाट्यमय घडामोडी नंतर सरपंच दुर्गाबाई जयवंता उर्वते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड सभेत उपसरपंच पदी आशाबाई जाधव यांचा चार विरुद्ध २ ने विजय झाला.तर मालवाडा येथे सरपंच सुनीता लक्ष्मण बेहेरे यांच्या अध्यक्षतेखालील सभेत राजू भिकू जाधव यांची बिनविरोध निवड झाली.मालवाडा येथे माजी सरपंच रमेश राठोड,धर्मा राठोड,यांची उपस्थिती होती.