ग्रामपंचायत च्या निकालात माहूर तालुक्यात महाविकास आघाडीची सरशी; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबर वर….तर पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व!

माहूर:- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी माहूर येथील तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता सुरू झाली.मतमोजणी नंतर लागलेल्या निकालात माहूर तालुक्यात महाविकास आघाडीची सरशी दिसून आली. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला तर पाठोपाठ शिवसेना उद्धव ठाकरेंनीही नेत्रदीपक विजय संपादन केले.काँग्रेस चा या निवडणुकीत पूर्ता फज्जा उडाल्याचे दिसून आले,भाजपा प्रेनित ग्राम पंचायती अपवाद एक दोन वगळता विशेष काही करता न आल्याने तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा म्हणून पुढे आला आहे.

अत्यंत चुरशी च्या लांजी, मालवाडा, कुपटी, रुई, लखमापूर, महादापूर, मछिद्र पार्डी,बोरवाडी,वानोळा,शेख फरीद वझरा, पवनाळा,या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रेनित सरपंच निवडून आले आहे.तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सरपंच हे तालुक्यात दुसऱ्या क्रमांकावर आणि बंजारा तांडा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहे, भोरड मध्ये भाजपा ला विजय मिळविता आला तर काँग्रेस चा या निवडणुकीत पार फज्जा उडाल्याचे दिसून आले.२७ पैकी २६ ग्राप ची आज मतमोजणी पार पडली, वसराम नाईक तांडा येथे निवडणुकीवर बहिष्कार होते.निवडणूक मतमोजणी प्रक्रिया अत्यंत शांतपने संपन्न झाली.या वेळी पोलीस  विभागाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

   हे आहे नवे गाव कारभारी….

विलास कानबा तोड़कर (पाचोंदा),प्रतिभा सुभाष आडे (महादापूर) प्रविका इंदल राठोड  (पवानाळा),सुनीता लक्ष्मण बेहेरे (मालवाडा),रमेश कुडमेते (पानोळा) रामेश्वर जाधव (गुडवळ),वंदना दुधराम राठोड (ईवळेश्वर), रूखमाबाई माधव आरके (पडसा),बंजारा तांडा सरपंच बिनविरोध, जयश्री प्रकाश वाढवे (मछिद्र पार्डी )बाळु तिळेवाड (दिघडी कु.),हिंगणी सरपंच पदासाठी एक ही अर्ज न आल्याने रिक्त, सीमा बाई गणेश राठोड (मांडवा),सुलोचना अर्जुन पवार (दत्तमांजरी),अंजली गजानन राठोड (बोरवाडी),सिमा राजु धबडगावकर (शेकापुर) बिनविरोध,मारोती रेकुलवार (लांजी),रुक्मिणी नागोराव मडावी (भगवती) बिन विरोध, गोकरणा बाई सुरेश अंकुरवार(वायफणी),जनार्दन हुसेन धूर्वे(भोरड),लता गणेश राऊत… (रुई),प्रफुल्ल बंडु भुसारे (कुपटी) दीपक संभाजी केंद्रे (शेख फरीद वझरा), सुनीता देवराव सिडाम(वानोळा)दुर्गा संतोष जाधव(तांदळा)गणेश दत्तराम राठोड (लखमापूर) …..