स्वतंत्र मराठवाडा च्या निर्मिती साठी ॲड.गुणरत्न सदावर्ते यांचा पुढाकार!

माहूर:- मराठा आरक्षण व त्या नंतर एस. टी.कर्मचाऱ्यांच्या अंदोलणाने प्रकाश झोतात आलेले ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी आता स्वतंत्र मराठवाडा च्या निर्मिती ची मागणी केली आहे.ॲड.गुणरत्न सदावर्ते हे नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आज आले होते.माहूर हे त्यांचे सासर असून याच देवभूमी तुन आपण स्वतंत्र मराठवाडा च्या निर्मिती साठी लढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मराठवाडा आणि विदर्भ ही छोटी राज्य म्हणण्यापेक्षा स्वतंत्र राज्य निर्माण झाली पाहिजेत,मुंबई हे केंद्र शाशित प्रदेश व्हायला पाहिजे. त्यांचा कारभार स्वतंत्रपणे चालला पाहिजे. त्या भागातील मागासलेपण संपवण्याकरता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून नवीन राज्य निर्मिती रचनेनूसार छोट्या राज्याची निर्मिती झाली तर खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकते असे ते म्हणाले.ते सोमवार दिनांक १९ रोजी माहूर येथे आले होते.या वेळी त्यांनी समाजसेवक नंदू संतान यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईक पणे विचारपूस केली.त्या नंतर त्यांनी माहूर गडावर जाण्यासाठी प्रस्तावित असलेल्या स्काय वॉक,लिफ्ट च्या नियोजित जागेची व मातृतीर्थ तलाव परिसराची पाहणी केली व त्या ठिकाण चे महत्व जाणून घेतले.