सातव्या वेतन आयोगाचा एस.टी कर्मचाऱ्यांना लवकरच लाभ मिळेल:- जयश्री पाटील

माहूर:- एस. टी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरण चा मुद्दा व इतर समस्या घेऊन आम्ही लढा उभारला असून नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आम्ही भेट घेतली असून लवकरच सातव्या वेतन आयोगाचा एस.टी कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल असे मत जयश्री पाटील यांनी व्यक्त केले.
माहूर आगारात ‘एसटी कष्टकरी जनसंघा’ च्या फलकाचे अनावरण संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष ॲड. जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कडून जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात आले.आज दिनांक १९ सोमवार रोजी माहूर आगाराला संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष ॲड. जयश्री पाटील व वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भेट दिली. व शाखे चे अनावरण केले.त्या नंतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना  गुणरत्न सदावर्ते म्हणाले की,माहूर हे शक्तीपीठ असून दत्त प्रभूचे ठिकाण असून संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष ॲड. जयश्री पाटील यांचे माहेर सुद्धा माहूर चे आहे.‘एसटी कष्टकरी जनसंघ’ या संघटनेच्या माध्यमातून कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्या  साठीचा आमचा लढा असून काँग्रेस चे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळात त्यांनी प्रवास तिकीट वर लावलेल्या टॅक्स मुळे च एस.टी.चे कर्मचारी योग्य पागारा पासून वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला.ॲड. जयश्री पाटील यांच्या माध्यमातून अलीकडच्या काळात वाढीव बोनस आणि टी. ए.चा लाभ कर्मचाऱ्यांना मिळाला आहे.जे मागील ४० वर्षाच्या काळात जे जमले नाही ते जयश्री पाटील यांनी करून दाखविल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,जेवढा महत्वाचा वेगळा विदर्भाचा, स्वतंत्र मराठवाडा चा मुद्दा आहे तेवढाच महत्वाचा एस. टी.कर्मचाऱ्याच्या विलीनीकरण चा मुद्दा असल्याचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.माहूर आगाराच्या विविध समस्या सबंधती मंत्र्या सोबत चर्चा करून सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.या वेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या माहूर येथे माझे १० वी पर्यंत शिक्षण झाले असून माझे महाविद्यालयीन शिक्षण केवळ आणि केवळ लालपरी मुळे होऊ शकला असल्याचे सांगत एस.टी.ची बस नसती तर मी आज इथ पर्यंत पोहचले नसते असे सांगितले. सत्यावर माझा विश्वास असून सत्य कधी पराजित होऊ शकत नाही म्हणूनच सत्याची असलेली कष्टकरी एस टी.कर्मचाऱ्यांची लढाई आम्ही जिंकली आहे.असे जयश्री पाटील यांनी शेवटी सांगितले.या वेळी आगर प्रमुख रामटेके,एसटी कष्टकरी जनसंघा चे माहूर आगाराचे आर. एम.हिरेमठ,एस.जे.राठोड, डी.एस. कोकने,पी. डी.देशमुख,एस.जी.बोरकर,आर.एस.इंगोले,एस. डी.मतीन,किशोर महाराज ओहरी, एस.एम.पवार,यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.
          रेल्वे मंत्र्यांना सदावर्तेचा फोन….
माहूर हे देव देवितांचे माहेर असल्याने माहूर येथे रेल्वे आवश्यक आहे.मागील अनेक दिवसा पासून रेल्वेचा मुद्दा मागे पडल्याने त्यांनी थेट रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून त्यांना माहूर चे महत्व सांगत रेल्वेची गरज लक्षात आणून देत रेल्वे मंत्र्यांच्या वेळ मागून घेतला असून लवकरच मुंबई येथे त्यांची ते भेट घेणार आहेत.