रेती वाहतुक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वारास चिरडले!

महागाव:- रेती वाहतुक करणाऱ्या भरधाव टिप्परने चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना महागाव तालुक्यातील गुंज येथे आज शनिवार दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली आहे.माहुर कडुन पुसद येथे रेती वाहतुक करणारा टिप्पर क्र.एम एच ०६एसि ६७५४ हा भरधाव वेगाने जात असताना गुंज येथे बस स्थानकानजीक असलेल्या निर्माणाधिन पुलाजवळ समोर असलेल्या दुचाकी क्र एम एच २९एए४३८ला चिरडल्याने दुचाकीस्वार सुनिल धानोरकर(वय४०वर्षे) रा.मधुकर नगर पुसद हा जागीच ठार झाला आहे.

रेती वाहतुक करणारा टिप्पर हा भरधाव वेगाने पुसद कडे जात होता अशातच आज गुंज येथे आठवडी बाजार असल्याने नेहमीपेक्षा जास्त वर्दळ याठिकाणी राहत असुन बस स्थानकाजवळील पुल मागील दोन वर्षांपासुन निर्माणाधिन अवस्थेत असल्याने या ठिकाणी अतिक्रमणाचा विळखा पडल्याने टिप्पर चालकाला समोरचे काहीही दिसुन न आल्याने हा अपघात घडून धानोरकर यांना आपला प्राण गमवावा लागला आहे.त्यामुळे या पुलाचे अपुर्ण काम पुर्ण करावे व रेतीच्या होणाऱ्या अनियंत्रित वाहतुकीवर लगाम घालावा अशी नागरिक मागणी करीत आहेत.या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे हे आपल्या ताफ्यासह पोहचले असुन वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.