माहूर बंद ला हिंसक वळण; चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ माहूर कडकडीत बंद!

माहूर:-भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आज मंगळवार रोजी माहूर बंद ची हाक देण्यात आली आहे.या बंद ला माहूर मध्ये हिंसक वळण मिळाले आहे,बंद मध्ये शामिल विविध बहुजन विचाराच्या संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचंड घोषणा बाजी करत निषेध व्यक्त करीत आहे.या ठिकाणी टायर ची जाळपोळ ही करण्यात आली आहे.एकंदरीत माहूर कडकडीत बंद असून या बंद ला हिंसक वळण लागले आहे.

भाजपतील नेत्यांनी राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याचे सत्रच सुरू केले आहे. ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. अशा घटना पुन्हा झाल्या तर समस्त बहुजन समाज, दलित समाज तुमचे सरकार घरी पाठविल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.राष्ट्रपुरुषांविषयी अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकणाऱ्या भीम सैनिकाला अटक करून पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला. राज्यपाल कोसयारी विरुद्ध ही आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.व्यापारी वर्गाने बंदला प्रतिसाद दिला.तर आंदोलनाला भाजपा सोडून विविध राजकीय पक्षांनी सुध्दा पाठिंबा दिला आहे.