चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी माहूर बंद ची हाक!

माहूर:- भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ उद्या मंगळवार रोजी माहूर बंद ची हाक देण्यात आली आहे.
शिव, शाहू, फुले, आंबेडकर जर नसते तर आजचा महाराष्ट्र घडलाच नसता. भाजपाच्या लोकांमध्ये महापुरुषांच्या बाबत बदनामीकारक वक्तव्य करण्याची स्पर्धाच लागली आहे.महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा विरोधात हा बंद असल्याचे आयोजकांनी सांगितले.