राज्यपाल कोश्यारी, त्रिवेदींविरोधात संतापाची लाट; माहूर मध्ये संभाजी ब्रिगेड चे आंदोलन!

माहूर:- देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या बाबतीत व इतर महापुरुषांच्या बाबत वारंवार चुकीच्या पद्धतीने भाष्य करून महाराष्ट्रच नव्हे तर देशभरतील शिवभक्तांच्या भावना दुखावणारे महाराष्ट्राचे विकृत मनोवृत्तीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून तात्काळ बडतर्फ करा या मागणी साठी माहूर येथे आज मंगळवार दिनांक  ६ रोजी संभाजी ब्रिगेड कडून आंदोलन करत प्रचंड घोषणा बाजी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्रात आल्यापासूनच विविध महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधाने व्यक्त करून नागरिकांच्या भावना दुखावण्याचे काम करीत आहेत. देशांचे महानायक व प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवरायाबाबत त्यांनी नुकतेच एक विधान केले असून त्याचीच री ओढत भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी व भारतीय जनता पक्षाचे जालना महारष्ट्र चे खासदार रावसाहेब दानवे व भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी सुद्धा छत्रपती शिवरायाबाबत चुकीचे विधान केल्याने शिवप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.देशाची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या बाबतीत व इतर महापुरुषांच्या बाबत वारंवार चुकीच्या पद्धतीने भाष्य करून महाराष्ट्रच नव्हे तर देशभरतील शिवभक्तांच्या भावना दुखावणारे महाराष्ट्राचे विकृत मनोवृत्तीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून तात्काळ बदली करणे बाबत. तसेच भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी व भारतीय जनता पक्षाचे जालना महारष्ट्र चे खासदार रावसाहेब दानवे व भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड या विकृत मनोवृत्तीच्या लोकांविरुद्ध कारवाई करण्यात यावी.चुकीच्या पद्धतीने भाष्य करून महाराष्ट्रच नव्हे तर देशभरतील शिवभक्तांच्या भावना दुखावणारे महाराष्ट्राचे विकृत मनोवृत्तीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी या वेळी निवेदनातून 
संभाजी ब्रिगेड चे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश जाधव, तालुकाध्यक्ष विशाल शिंदे, प्रवीण पोटेकर,अमोल शिंदे, बालाजी टनमने, विनोद सुर्यवंशी, अमोल कदम,आगा खाण, सुग्रीव कदम, शुभम गांदेवर,अभी खंदारे प्रसाद पाऊल बुधे यांनी केली.या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला.या वेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची उपस्थिती होती.पोलीस निरीक्षक नामदेव रिठ्ठे व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.