माहूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी ‘एक वही एक पेन’ वाटप करून महामानवास अभिवादन !

माहूर :द अँबिशिअस करिअर अकॅडमी व भीम टायगर सेना तालुका माहुर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. ६ डिसेंबर २०२२रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ‘एक वही एक पेन’ नामक उपक्रम राबविण्यात येऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
महामानवांच्या विचारांना पुढे न्यायचे असेल तर एक वही एक पेन सारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून महामानवांनी आपल्याला शासनकर्ती जमात बनविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले.बुद्ध, आंबेडकर विचारप्रणाली ही अनुसरण्यासह कृतीत उतरविण्याची आहे. ‘अत्त दीप भव:’ हा भगवान बुद्धांचा संदेश आणि त्याचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला सोपा मथितार्थ, हे तरुण वास्तवात उतरविण्यासाठी धडपडत आहेत. आजही समाजातील मोठा वर्ग विपन्नावस्थेत जग त्याला शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे ला ही बाब हेरून या तरुणांनी शिकणाऱ्या हातात वही पेन देण्यास सुरवात केली आहे.बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या शिक्षण प्रसारासाठी हातभार लावणे,त्यासाठी अनुयायांनी ‘एक वही, एक पेन’ द्यावा हा आमचा उपक्रम मागील ९ वर्षापासून अविरत सुरू असल्याचे आयोजक राहुल भगत यांनी सांगितले.याप्रसंगी,माहूर नगरीचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी,मेघराज जाधव,नंदू संतान, निरधारी जाधव,उमेश जाधव,प्रा.भगवान राव जोगदंड,अभिजित राठोड,प्रतीक कांबळे,पद्मा ताई गीऱ्हे ,जयंत गीऱ्हे,सूरज चव्हाण,अभी खंदारे,अमित येवतिकर,यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, सुजाण नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभाग घेतला.या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा करीत नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी १०० वही १०० पेन भेट देऊन तर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद माहूर कडून एस.एस.पाटील व सहकारी शिक्षकांनी वह्या पेना देऊन सहभाग नोंदविला.