माहुर येथे कंधार ते माहूर पदयात्रा दाखल! व्यसनमुक्त पायदळ दिंडीला २१ वर्षाची परंपरा….

माहुर :- मागील २१ वर्षापासून परंपरा असलेल्या कंधार येथील पायदळ दिंडीचे माहूर येथील दत्त शिखरावर आज दिनांक ६ मंगळवार रोजी आगमन झाले.या दिंडीतून व्यसनमुक्तीचा प्रचार करण्यात येत असून दिंडीत सहभागी दत्तभक्त मुक्कामी असलेल्या ठिकाणी समाज प्रबोधन करीत असतात.
दत्तजयंती निमित्त मागील २१ वर्षे पूर्ण करुन पदयात्रा तालुका कंधार,लोहा, नांदेड, अर्धापुर, कळमनुरी, हदगाव, उमरखेड,महागाव,माहुर नऊ मार्गक्रम सेवानिवृत्त प्रा. मेजर डी.जे. बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली  ३० नोव्हेंबर रोजी पदयात्रा  बालाजी मंदिर भवानी नगर कंधार  येथून टाळ मृदंगाच्या गजरात दत्त नामस्मरण करीत निघाली. मागील एकेवीस वर्षांपासून श्रीक्षेत्र माहूर येथे ७ दिवसाची पदयात्रा  पोहचली.रेणुका माता, दत्तप्रभुचे व अनुसया मातेच्या दर्शनाने पदयात्रेची सांगता झाली.  यावेळी नारायण बनसोडे, मारोती सुवर्णकार,जी.एस.मंगनाळे, गोपाळकृष्ण मोरे , सचिन परभणीकर,पंढरी आईनवाड, नामदेव पंदेवाड, हानमंतराव मेहकरकर,  डॉ.केदार बचाटे ,  डॉ.राम बामनवाड भगवान अग्रवाल आदीसह पदयात्रेमध्ये विळेगाव, नवरंगपुरा,फुलवळ आदी गावातील अनेक महिला पुरुष पदयात्री भक्तिमय वातावरणात  सहभागी झाले.