देवस्थान जमीन आंदोलनाची यशस्वी सांगता! जमिनीच्या अधिकारासाठी निरतंर लढत राहू – काॅ.शंकर सिडाम

माहुर: मागील १३ दिवसा पासून माहूर तहसील कार्यालय पुढे सुरू असलेल्या किसान सभेच्या महामुक्काम आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी नितिन राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यलय नांदेड येथे किसान सभा तथा देवस्थान जमिन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्याची बैठक काल सोमवार रोजी बोलवली होती.या बैठकीत ७ अ आणि ७ ब ची कार्यवाही करुन अनुदान रक्कम वाटप करण्याबाबद काॅ.अर्जुन आडे ,काॅ.शंकर सिडाम यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली.आंदोलनाच्या मागण्या बाबत सकारात्मक विचार करुन देवस्थान जमिन कसणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान लवकरच वाटप व्हावे या साठी शुक्रवार दिनांक ९ रोजी दत्त शिखर देवस्थान संस्थान विश्वस्त आणि तहसीलदार माहुर यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्याचे लेखी आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्याने या महामुक्काम आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.

अखिल भारतीय किसान सभा तथा देवस्थान जमिन संघर्ष समितीच्या वतिने २३ नोव्हेंबर पासून शेकडो शेतकरी कष्टकऱ्यांनी देवस्थान जमिनीच्या प्रश्नावर महामुक्काम आंदोलन माहूर तहसील कार्यालय समोर सुरू होते.या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनी व सामजिक संघटना यांनी पाठिंबा दिला होता.मात्र काही मागण्या न्यायप्रविष्ठ व किचकट असल्याने यातून मार्ग निघत नव्हता.शेवटी किसान सभा आणि देवस्थान संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्या सोबत जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या एकूण घेतल्या. व सकारात्मक प्रतिसाद देत अनुदान वाटपाचा मार्ग कसा मोकळा करता येईल या बाबत शुक्रवारी पुन्हा बैठकीचे आयोजन केल्याने जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत माहुर येथे चालेल्या आंदोलनाची सांगता करण्यात आली.यावेळी आंदोलनाचे मुख्य नेत्तुत्व असलेले काॅ.शंकर सिडाम यांनी देवस्थान जमिनीच्या संपूर्ण अधिकारासाठी जिवाची बाजू लावून निरंतर लढत राहू असे मत व्यक्त केले. तर आंदोलनाचे समारोप करतांना काॅ.अर्जुन आडे यांनी जमिनीच्या अधिकारासाठी लाल बावटा मजबूत धरून संघर्ष करत राहण्याचे अव्हाण केले.जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत काॅ.अर्जुन आडे ,काॅ.शंकर सिडाम,प्रमसींग चव्हाण, किसन जगदाळे, मनोज किर्तने, गणेश जाधव आदि पदाधिकाऱ्यारी उपस्थित होते.तर निरतंर तेरा दिवस चाललेल्या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी काॅ.किशोर पवार,काॅ.प्रल्हाद चव्हाण ,काॅ.अमोल आडे,काॅ.प्रफुल कवुडकर, काॅ.वंसत राठोड,वंसत चव्हाण, तारासींग जाधव,शे.महेबुब, कैलास कांबळे,सुज्जन भारती, सुभाष राठोड,वंसत राठोड,राजकुमार पडलवार आदिनी प्रयत्न केले.शेवटी काॅ.किशोर पवार यांनी आभार मानत जमिन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बाप्पाची,लढेगे जिंतेगे या गगनभेदी घोषनांनी आंदोलनाची सांगता करण्यात आली.