काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतले रेणुका मातेचे दर्शन; गडावरील पायऱ्यावर घेतला उसाच्या रसाचा आस्वाद

माहूर:-  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे हे आज माहूर गडावर दर्शनासाठी आले होते, यावेळी त्यांनी माता रेणुकीचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर गडावरून पायऱ्या उतरताना असलेल्या एका रसवंती वर उसाचा रस पिण्याचा मोह त्यांना अवराला नाही. यावेळी नाना पटोले यांनी स्वतः रसवंती ही चालवली.
साडे तीन शक्ती पिठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर आज दिनांक ५ सोमवार रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले.या वेळी संस्थांनच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.त्या नंतर श्री रेणुकामाता मंदिर कार्यालयात माहविकास आघाडीतील या दोन्ही नेत्यात दिलखुलास गप्पा झाल्या.भारत जोडो यात्रा यशस्वी झाल्याबद्दल नाना पटोले यांचे धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले.या वेळी माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय राठोड, ज्येष्ठ काँग्रेसी नेते नामदेवराव केशवे,राष्ट्रवादी चे जिल्हा बँक संचालक दिनकर दादा दहिफळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,माजी सभापती मारोती रेकुलवार, प्रा.भगवानराव जोगदंड सर,अमजद पठाण वाईकर, मुनाफ पटेल, नगर पंचायत चे पाणी पुरवठा सभापती अशोक खडसे,काँग्रेस चे नगर सेवक प्रतिनिधी निसार कुरेशी,राजू सौंदलकर ,राष्ट्रवादी चे नगर सेवक प्रतिनिधी इरफान सय्यद,रणधीर पाटील,अपसर आली,अमित येवतिकर यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.