इच्छुक उमेदवारांची नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी; तहसील कार्यालयाला यात्रे चे स्वरूप

माहूर-  माहूर तालुक्यात होऊ घातलेल्या २७ ग्रामपंचायत निवडणुका ला आता वेग आला असून उद्या दिनांक २ शुक्रवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटचे दिनांक आहे.त्या मुळे आज गुरुवार रोजी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी होत आहे.त्या मुळे तहसील कार्यालयाला यात्रे चे स्वरूप प्राप्त झाले आहे.
ग्राम पंचायत निवडणुकीत इच्छुकांना सध्या सर्वात मोठा अडथळा होत आहे तो सर्वर डाऊन चा,निवडणूक विभागाची साईट स्लो चालत असल्याने एक एक अर्जा साठी इच्छुकांना तासनतास कॉम्पुटर ऑपरेटर कडे बसून राहावे लागत आहे. उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करून लागणार भरलेले अर्ज तहसीलमध्ये ऑफलाईन पद्धतीने जमासुद्धा करावे लागत आहे.नामनिर्देशन पत्र दाखल करण्या साठी आज आणि उद्या असे दोन च दिवस असल्याने इच्छुक उमेदवारांची तहसील कार्यालयात झुंबड उडाल्याचे दिसून आले.
जात पडताळणीसाठीची पोचपावती चालणार….
नामांकन पत्र दाखल करताना उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. मात्र, एकाचवेळी जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे अर्ज दाखल करताना पोच पावतीसुद्धा चालणार आहे. तात्पूरत्या स्वरूपात पोच पावती चालली, तरी निवडूण आलेल्या उमेदवाराला वर्षभरात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
मतदारांनाच निवडता येणार सरपंच….
सरपंचाची निवड पूर्वी ग्रामपंचायत सदस्यांमधूनच केल्या जात होती. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा सरपंचाची निवडणूक थेट मतदारांमधून करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आगामी २७ सरपंचाची निवड सुद्धा अशाच पद्धतीने होणार आहे.