माहूर(सरफराज दोसानी):- माहूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे कंत्राटी डॉक्टर निरंजन केशवे हे काँग्रेस या राजकीय पक्षाचे राज्याचे पदाधिकारी असल्याने त्यांची कंत्राटी सेवा समाप्त करा आशी तक्रार मनसे चे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांनी केल्यावरून दिनांक ९ नोव्हेंबर रोजी जिल्हा शल्यचिकित्स भोसीकरांची यांनी ५ सदस्य असलेली चौकशी समिती तय्यार करून ३ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते मात्र १३ दिवस होऊन ही चौकशी समिती फिरकलीच नसल्याने “गोल माल हैं भाई सब गोल माल हैं ” चा प्रत्यय येत असून जिल्हा शल्यचिकत्सक भोसीकरांची यांना विचारणा केली असता त्यांनी तक्रारी अर्जावरून चौकशी समिती नेमली असताना माझ्या कडे तक्रार च प्राप्त नसल्याचे सांगत बचावात्मक पवित्रा घेतल्याने तक्रारदारांनी आता थेट मुंबई गाठून आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट घेणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीला सांगितले आहे.


आज आरोग्य शिबिरांच्या निमित्ताने माहूर येथे आलेले जिल्हा शल्यचिकित्सक भोसीकर यांना विचारणा केली असता त्यांनी प्रथम माझ्या कडे तक्रारच प्राप्त नसल्याचे सांगत प्रथम युटर्न घेतला होता,मात्र नंतर आपण तक्रारी वरून समिती स्थापन केल्याचे त्यांना लक्षात आणून दिल्यावर त्यांनी आरोग्य विभागात अनेक ही कामे असतात त्या मुळे समिती ला यायला उशीर झाला असावा असा पवित्रा घेत कोणाला ही पाठीशी घातले जाणार नाही असे सांगितले.विशेष म्हणजे माहूर च्या ग्रामीण रुग्णालय मागील वर्षभरात काहींनी ड्युटी न करता पगाराचे अपहार केले आहे असा आरोप निवेदनात असल्याने त्या गोलबंगलात कोण कोण शमील आहे याचा पण तपास व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.जिल्हा शल्यचिकित्स आणि त्यांच्या गठित समिती ने वस्तुनिष्ठ चौकशी करावी चौकशीत कोणालाही वाचविण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा लोकशाही मार्गाचा वापर करून नाईलाजास्तव उपोषणाला बसावे लागेल असा इशारा मनसे चे माजी तालुकाध्यक्ष गजानन कुलकर्णी यांनी दिला आहे.
