माहूर:- गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याची आदिवासी बहुल माहूर किनवट मांडवी भागात आरोग्य विभागाकडून होणारी शिबिरे ही अत्यंत उपयुक्त असून आरोग्य शिबिर ही या भागाची गरज असल्याचे मत आमदार भीमराव केराम यांनी व्यक्त केले.


या शिबिरा अंतर्गत स्कील मिक्स सेवे अंतर्गत आरोग्य सेवेतील श्री गोबिंद सिंघ जी स्मारक,जिल्हा रुग्णायात नांदेड येथील सर्व विशेष तज्ञ डॉक्टर्स दिनाक २३ रोजी तपासणी साठी माहूर च्या ग्रामीण रुग्णालय मध्ये शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.शिबिरात हायड्रोसिल (अंड वृद्धी), हरणीया, अपेंडीक्स,शरीरावरील सर्व गाठीचे शस्त्रक्रिया व दंत चिकित्सा औषध उपचार मोफत करण्यात येणार आहे.३५ वर्षांवरील सर्व महिलांचे गर्भाशयमुख व स्तन कॅन्सर तपासणी व उपचार, मानसिक आजार व तपासणी उपचार, दंत चिकित्सा व उपचार,उच्च रक्तदाब,सुगर चिकित्सा केली जाणार आहे.या सह रुग्णांचे एक्सरे, ई सी जी, सोनिग्रोफी,व रक्त तपासणी व ऑपरेशन साठी लागणारे साहित्य औषध उपचार व मोफत करण्यात येणार आहे.शस्त्रक्रिया गृह हे सुसज्ज व सोईयुक्त असून येथे ऑपरेशन थिएटर मध्ये नांदेड जिल्ह्यातील नामांकित सर्जन व भूलतज्ञांच्या देख रेखिखाली शस्त्रक्रिया करण्यात येईल. ऑपरेशनसाठी लागणारे साहित्य व औषध उपचार मोफत करण्यात येणार असल्याने रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे अहवान प्रास्ताविकातून डॉ.भोसीकर यांनी केले. संचालन एस.एस पाटील यांनी तर आभार डॉ.व्ही.एन.भोसले यांनी मानले.
