अंधेरी पोटनिवणुकीत नोटा ला पडलेली मते हा मतदारांनी भाजपला दिलेला इशारा;- नाना पटोले

माहूर(सरफराज दोसाणी):- अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत  उद्धव ठाकरे शिवसेनेच्या ऋतुजा लटके विजयी झाल्या आहे,त्या ठिकाणी नोटा ला पडलेली मते ही  अंधेरी मतदार संघातील मतदारांनी भाजपाला एका प्रकारे दिलेला इशाराच असून राज्यातील महागाई,बेरोजगारी ने जनता त्रस्त असून महागाई बेरोजगारी या सह शेतकरी व्यापारी यांना न्याय दिला नाही तर येत्या निवडणुकीत मतदार भाजपला नोटा चा पर्याय वापरेल असा टोला काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.

आज दिनांक ६ रविवार रोजी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माहूर दौऱ्यावर आले होते या वेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी राज्यातील राजकीय घडामोडी वर चर्चा केली.ते म्हणाले अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधी मतदारसंघात नोटाला मतदान करा,असा प्रचार सुरु झाला होता. हा भाजपच नेत्याचा बालिशपणा असून अंधेरी निवडणुकीतून भाजपने पळ काढल्याचे सांगत राज्यातील जनतेच्या महत्वाच्या प्रश्नावर बोलण्याचे टाळून टिंगल टवाळीत भाजपचे नेते पटाईत असून पत्रकारांची ही एच.एम.व्ही. म्हणून ते टिंगल करतात.असे ही नाना पटोले यांनी सांगितले.या वेळी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष संजय राठोड यांच्या सह काँग्रेस ची स्थानिक मंडळी उपस्थित होती.