माहूर:- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी आज रविवारी दुपारी बारा वाजता माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात दर्शन घेऊन आरती केली व राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी यात्रा ठरावी या साठी नाना पटोलें यांनी रेणुका मातेला साकडे घातले.
दिनांक ०७ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर दरम्यान भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यातून जाणार आहे, या करिता राज्यातील सर्वच प्रमुख नेते सध्या नांदेड मुक्कामी असून दरम्यान आज दिनांक ६ रोजी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे माहूर गडावरील माता रेणुकेच्या दर्शनासाठी आले होते,या वेळी त्यांनी श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले व आरती केली.या वेळी त्यांचा संस्थान च्या वतीने विश्वस्थ चंद्रकांत भोपी,आशिष जोशी यांनी यथोचित स्वागत सत्कार केला.या वेळी मुख्य पुजारी शुभम भोपी,काँग्रेस चे तालुकाध्यक्ष संजय राठोड, किनवट चे नगरसेवक अभय महाजन, गिरीश नेम्मानिवार,जावद आलम, फारुक चव्हाण,प्रवीण शेख,शेख सैनाज यांच्या सह माहूर येथील नगरसेवक ,काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.