माहूर:- माहूर गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या क्रुझर गाडी ला परतीच्या प्रवासात माहूर निकट च्या उखडी घाटात कठीण वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात ५ जण जखमी झाले आहे.यात एक वृद्ध महिला भाविकांचा समावेश आहे.
आज सप्तमीला माहूर गडावर भाविकांनी तोबा गर्दी केली होती.दर्यापूर जिल्हा अमरावती येथील भाविक ही दर्शनासाठी माहूर गडावर आले होते,दर्शन आटपून परतीच्या प्रवासात रात्री १० वाजेच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय जवळ कठीण वळणावर चालकाचा ताबा सुटल्या ने गाडी ने सुरक्षा कठड्याला धडक दिली.यात गाडी मधील भाविका पैकी ५ जणांना मोठी दुखापत झाली.घटनेची माहिती मिळताच माहूर नगरपंचायत चे नगराध्यक्ष फिरोज भैया दोसानी व नगरपंचायत चे कर्मचारी,गंगाधर दळवे,विजय शिंदे,कृष्णा चव्हाण यांनी तत्काळ घटना स्थळ गाठून भाविकांची विचारपूस केली व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.एन भोसले यांना फोन करून रुग्णवाहिका बोलावून घेतली.रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्या ठिकाणी डॉ. व्ही.एन.भोसले, डॉ.किरण कुमार वाघमारे,डॉ.वसीम यांनी जखमी वर उपचार केले.सध्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
@@ रुग्णालयात डॉक्टरांची उपस्थिती अन् जखमी वर तातडीने उपचार@@
माहूर ग्रामीण रुग्णालय मागील काही दिवसा पासून डॉक्टरांच्या अनुपस्थिती मुळे वादात सापडले असल्याने रुग्णालयाला च उपचाराची गरज निर्माण झाली होती.नवरात्र काळातील २ घटने नंतर ग्रामीण रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराचे पार धिंढोरे निघाले होते,या वर माध्यमानी पुरव्या सह लागतात वृत प्रकाशित केल्याने आज रविवारी रात्री झालेल्या अपघातातील रुग्णांना तातडीने उपचार मिळाले.जिथे एक डॉक्टर शोधून सापडे ना त्या ठिकाणी नाईट ड्युटी ला ३ डॉक्टर हजर असल्याचे दिसून आले.त्या मुळे हळूहळू का होईना रुग्णालयाची गाडी रुळावर येताना दिसत आहे.