माहूर :- माहूर शहरात विक्री होणारा अवैध गुटका असो की उघड्यावरील खाद्य पदार्थ विक्री असो,किंवा मुद्दत संपलेल्या खाद्य पदार्थांची विक्री असो या ठिकाणी सर्व काही आलबेल असल्याचे भासवून खाबुगिरीला चटावलेले अधिकारी मंथली मिळाले की याकडे सोयिस्कररित्या डोळेझाक करताना दिसून येत आहे.
माहूर गडावर साजरा होणाऱ्या नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार रोजी झालेल्या आढावा बैठकीला अन्न व औषध प्रशासनाने पाठ दाखविल्याने एरवी नागरिकांच्या हाकेला साद न देणारे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आपत्ती व्यवस्थपणा खाली घेण्यात आलेल्या बैठकीला ही अनुपस्थिती राहिल्याने जिल्हाधिकारी यांनी आता दखल घेणे गरजेचे आहे.माहूर शहर अवैध गुटखा विक्री साठी माहेरघर बनले आहे,शिवाय या ठिकाणी पिशवी बंद भेसळयुक्त व मुद्दत संपलेले दूध, मिठाई,किराणा दुकानातून दरोरोज लागणारे खाद्य तेल सह नसल्याचे निषकृष्ठ पदार्थ व अगदी फळेदेखील घातक रसायनापासून पिकवून विकले जात असल्याची ओरड आहे.किराणा दुकानातून दिवसा ढवय्या खुले आम होणारी गुटखा विक्री वर कधीही अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नजरेत येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.आजवर ज्या कार्यवाह्या गुटखा विक्री विरुद्ध झाल्या त्या पैकी अधिक अधिक कार्यवाह्या पोलिसांनी केल्या आहेत.मग अन्न व औषध प्रशासन केवळ मलिदा खण्या साठीच आहे की काय अशी चर्चा सुरू आहे.शहरात अवैध गुटखा विक्रीला ऊत आला आहे. एवढंच नाही तर काही गुटखा विक्रेते होलसेलर बनले असून तालुक्यातील खेड्या-पाड्यात गुटखा पुरवण्याचे काम सुरू केले आहे.या अवैध गुटखा विक्रीला अन्न प्रशासनातील अधिकाऱ्यांचे सार्थ पाठबळ मिळत असल्याने तेरी भी चुप मेरी भी चुप,समाजाच्या नजरेत मात्र पोलीस बदनाम ठरू लागले आहेत. छोट्या टपरीपासून ते मोठ्या दुकानांमधूनही परराज्यातून येणाऱ्या अनेक ब्रँडच्या गुटख्याची खुलेआम विक्री होत असून, अन्न व औषध प्रशासनाने याबाबत डोळेझाक करण्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे या सर्वच प्रकारात मिलीभगत असल्याचे खुलेआम आरोप जनतेतून होत आहे. या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनच ढिलाई दाखवली जात असल्याने कायदा कडक असूनही जिल्हात खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे.येत्या दोन दिवसावर नवरात्र महोत्सव सुरू होणार असून लाखो भाविकांची माहूर शहरात दर्शनासाठी इंट्री होणार असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून अन्न व औषध प्रशासनाने किराणा दुकान, हॉटेल्स व गुटखा तस्करीचे गोडाऊन तपासून दोषी आढळल्या दोषीवर कारवाईचे धाडस दाखवावे अशी रास्ता अपेक्षा माहूर शहरातील नागरिकांनी व्यक्त केली असून दिनांक २२ रोजी आपत्ती व्यवस्थापनाखाली झालेल्या बैठकीत अनुपस्थितीत राहिल्याबाबत व कर्तव्यात कसूर केल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यावर काय कार्यवाही करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.