सरकारी पटेदार असलेल्या मयत खातेदारांच्या वारसांचे नावे 7/12 घ्या! नम्रता किर्तने यांची मागणी!

माहूर :- अनेक दिवसापासुन सरकारी पटेदार असलेल्या मयत खातेदारची नावे कमी करुन 7/12 वर वारसांची नावे फेरफार करुन न दिल्याने तालुकाभर अडचणी येत आहे.सरकारी पटेदार असलेल्या मयत खातेदारांच्या वारसांचे नावे 7/12  घ्या अशी मागणी तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष नम्रता किर्तने यांनी केली आहे.
मागील अनेक दिवसापासुन सरकारी पटेदार असलेल्या मयत खातेदारची नावे कमी करुन 7/12 वर वारसांची नावे फेरफार करुन न दिल्याने तालुकाभर अडचणी येत आहे. शासनाकडुन मीळत असलेले विविध अनुदान घेण्यासाठी अनेक कागद पत्रांची पुर्तता करुन बँकेला द्यावी लागत आहे. या मुळे शेतकऱ्यांना भरपुर चकरा मारव्या लागत असुन अर्थीक पीळवनुक होत आहे. काही कास्तकारांचे तर अजोबाच्या नावे शेती असुन दरवर्षी त्यांची अनुदानासाठी पीळवनुक होत आहे. एकदाचा हा प्रश्न मार्गी लावुन मयतांच्या वारसाना दिलासा दयावा व त्वरीत फेरफार बाबत वारसांचे प्रस्ताव स्विकारण्याचे आदेश सर्व तलाठी,मंडळ अधिकारी यांना देण्यात यावे,शेतक-यांच्या हितास्तव योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष नम्रता मनोज किर्तने यांनी केली असून या संदर्भात माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्फत विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांना ही शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्र्नी साकडे घातले आहे.