माहूर शहरातील महामार्गाचे काम प्रगती पथकावर;शहरातून जाणारा मार्ग १०० फुटाचा होत असल्याने नागरिकात समाधान!

माहूर:- माहूर शहरातील राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्यानंतर साहजिकच रस्त्याची रुंदी वाढणे अपेक्षित असताना महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी अकलेचे तारे तोडत सदर महामार्ग अरुंद केला होता. माहूर शहर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी प्रशस्त रस्ते असणे आवश्यक होते.ही  बाब हेरून देशाचे रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वात माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी पाठ पुरावा केला होता.या पाठपुराव्या ला यश आले असून शहरातून आता १०० फुटाचा महामार्ग होणार असल्याने नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
संग्रहित फोटो शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे रुंदी करणं करण्या ऐवजी सदर चा रस्ता हा अरुंद करण्याचा घाट महामार्ग विभागाने घातला होता.या विषयी मागील सहा महिन्यां पासून महामार्गाच्या कामाचा दर्जा व अंदाजपत्रका नुसार काम होत नसल्याची ओरड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रदीप नाईक करीत होते.त्या नंतर सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती,तर माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांची भेट घेऊन तक्रारीचा पाढा वाचला होता.शहरात अस्तित्वात आसणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा १०० फुटाचा रस्ता महामार्ग विभागाने अकलेचे तारे तोडत चक्क ७० फुटावर आणल्याने तीर्थक्षेत्र माहूर ला भविष्यात वाहतुकीचे मोठे संकट उभे टाकणारा ठरू शकते अशी वस्तुस्थिती तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडल्या नंतर त्यांनी महामार्ग विभागाला सूचना देऊन सदर मार्ग १०० फुटाचा करावा अशा सूचना दिल्या होत्या.त्या नंतर काही दिवस शहरातील बांधकाम थांबले होते.आता मात्र शहरात पूर्वी बांधकाम केलेल्या नाली ला तोडून रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने नागरिकात समाधान असून भविका सह विकास प्रिय नागरिकांनी रस्ता रुंद होत असल्याने या साठी प्रयत्न करणाऱ्या नेत्या सह कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.