माहूर:- हरित नवरात्र महोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून आज दोन ठिकाणी छापा टाकण्यात आला. यात कल्याण मटका जुगार खेळताना, तसेच आकड्यावर पैज लावताना आढळल्याच्या कारणावरून माहूर पोलिसात दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहूर पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यक्षेत्रातील अवैध धंदे समूळ नायनाट करून अवैद्य धंदे करणार्यावर वचक बसावा याकरिता माहूर पोलिसांकडून नवरात्र महोत्सवाच्या पूर्वसंध्येला
अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी ‘’वॉश ऑऊट’ मोहीम सुरु केली आहे.आज दिनांक २४ शनिवार रोजी याच मोहिमेसाठी शहरात पोलीस रस्त्यावर उतरले असून या पुढे कुठेही अवैध धंदे दिसताच धडक कारवाई केली जाणार आहे.माहूर चे पोलीस निरीक्षक नामदेव रीठे,पोलीस नाईक आडे,पोलीस शिपाई देशमुख , नागरगोजे हे गस्ती वर असताना मेडीकल चौकात चिंतामणी बेकरीच्या पाठीमागे एक इसम कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित आहे,अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्या ठिकाणी छापा टाकून त्याच्या कडून १०५० रुपये जुगाराचे नगदी रक्कम,एक पिवळया रंगाची बॉल पेन,दोन मटका जुगाराच्या चिठ्या जप्त करून त्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या कार्यवाहीत बस स्थानक परिसरात चींचेच्या झाडाखाली एक इसम मटका खेळवीत असताना आढळून आला.त्याच्या कडून ११५० रुपये जुगाराचे नगदी रक्कम व पिवळया रंगाची बॉल पेन, दोन मटका जुगाराच्या चिठ्या ज्यामध्ये कागदी चिठीवर सुरुवातीला कल्याण क्लोज नंतर मटक्याचे आकडे व शेवटी गोल वर्तुळात असा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काही दिवसा पूर्वी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर ही धाड टाकून कार्यवाही केली होती.तर पान टपरी व इतर ठिकाणी होणारी किरकोळ गुटका विक्री सुध्दा पोलिसांच्या मोहिम नंतर बंद झाली असून मोठे गुटखा तस्कर ही पोलिसांच्या रडारवर आहे.अवैध देशी दारू व गावठी दारू विरुद्ध ही माहूर पोलीस ॲक्शन मोडवर असून अवैध धंदे माहूर पोलीस ठाण्यांतर्गत कडकडीत बंद करून हरित नवरात्र साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी आमच्या प्रतिनिधी ला दिली आहे.
__________________________________________
माहूर शहारा सह माहूर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात छुप्या पद्धती ने सुरू असलेल्या अवैध धंद्या विरुद्ध आम्ही मोहीम हाती घेतली असून गोपनीय खबऱ्या मार्फत मिळणाऱ्या माहिती आधारे कार्यवाही करून अवैध धंद्याचा सफाया केला जाणार आहे.
नामदेव रिठे
पोलिस निरीक्षक माहूर