पाेलिसांचे स्पष्टीकरण:मुले चोरणाऱ्या टोळीची अफवा; विश्वास न ठेवण्याचे आवाहन

माहूर:- गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांच्या अपहरणा च्या  घटनेबाबत समाज माध्यमावर  व्हिडिओ प्रसारित केले जात आहे, ही एक अफवा असूनही, अशा प्रकारची कोणतीही घटना परिसरात घडलेली नाही. माहूर तालुक्यात कोणात्याही पोलीस स्टेशन मध्ये  लहान  मुलाला पळवून नेल्याच्या नोंद नाही.त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी केले आहे

मुले चोरून नेणाऱ्या परप्रांतीय टोळीचे व्हीडीओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहेत. त्यामुळे पालकांना चिंता वाढली आहे.शिवाय राज्यात परराज्यातून कामानिमित्त व छोटे व्यवसाय निमित्त काही नागरिक आले असुन ते व्यापारानिमित्त खेडोपाडी फिरत असतात अशा लोकांना चोर आहेत असे समजुन त्यांना पकडून मारहाण करणाऱ्या घटना सध्याला घडत आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांना कळविण्यात येते की आपण अशा लोकांना पकडून त्यांना मारहाण करू नयेत.आपल्या भागात लहान मुले पळवून नेणाऱ्या कुठल्याही टोळ्या नसुन तसेच लहान मुलं पळवून नेलेली कुठेही घटना घडलेली नाही.त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.असे आवाहन सिंदखेड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे

पोलीस स्टेशन सिंदखेड हद्दीतील सर्व नागरिकांना कळवण्यात येते कि, सध्या फेसबुक व व्हाट्सअँपच्या माध्यमातून लहान मुलांना पळून नेत आहेत. अशा स्वरूपाचे व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारीत होत असुन हे सर्व व्हिडिओ खोटे असुन नागरिकांनी अश्या व्हिडिओ वर विश्वास ठेवू नये. तसेच तसे व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारीत करू नये.

भालचंद्र तिडके
सहाय्यक पोलीस निरीक्षक
पोलीस स्टेशन सिंदखेड,जि.नांदेड