येत्या १५ दिवसात पंतप्रधान अवास योजनेची थकीत रक्कम देऊ:- मुख्य अभियंता जाधव

माहूर:-सर्वांसाठी घरे, या सकंल्पनेतून पंधप्रधान आवास योजना राबविण्यात आली. मात्र,अडीच ते तीन वर्षा पेक्षा जास्त कालावधी लोटूनही लाभार्थ्यांना अद्याप अर्धे हप्ते न मिळाल्याने त्यांची घरे अर्धवट राहिली असून लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.त्या मुळे नगर पंचायत माहूर ला प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रलंबित असलेला निधी शिफारस करुन मिळवून देण्यात यावे अशी मागणी सुनील गोविंद जाधव मुख्य अभियंता-२
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण,यांच्या कडे प्रत्यक्ष भेटून आज दिनांक २२ रोजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
माहूर शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ८४७ घरकुलांना मंजुरी मिळाली असून त्या तील  अनेक घरांचे काम पूर्ण ही झाले आहे,तर काहींचे अर्ध्या वर आहे.पहिल्या मंजूर डी.पी.आर मधील ८२ घरकुल लाभार्थ्यांचे ९९.२० लक्ष,दुसऱ्या डी.पी.आर मधील २६५ लाभार्थ्यांचे ३ कोटी ७ लक्ष ९० हजार,तिसऱ्या डी.पी.आर मधील ५०० लाभार्थ्यांचे ४ कोटी ५९ लक्ष ६० हजार असे एकूण पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचे ८ कोटी ५७ लक्ष रुपयाचा निधी शाशना कडून मिळत नसल्याने पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलधारकांची परवड होत आहे .या गंभीर प्रश्र्नी मंत्रालयात आज गुरुवार रोजी मागणी सुनील गोविंद जाधव मुख्य अभियंता-२
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण यांची माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी भेट घेऊन चर्चा केली असता येत्या १५ दिवसात प्रलंबित थकीत हप्ते देण्यात येईल व नवीन डी.पी.आर ही लवकरच मंजूर करू असे आश्वासन त्यांनी दिले.या पूर्वी दिनांक ०१ जून २२ रोजी तत्कालीन गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना भेटून ही फिरोज दोसानी यांनी निवेदन दिले होते, मात्र लाभार्थ्यांना घरकुल चे हप्ते मिळाले नव्हते.आता मुख्य अभियंता यांनी  आश्वासन दिल्याने घरकुल धारकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.