भाविकांसाठी केलेला उपाय योजनेची माहिती प्रसार माध्यमा पर्यंत पोहोचवा:- जिल्हा सत्र न्यायाधीश!

माहूर:- सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे, त्यामुळे संस्थांच्या कार्याचे व केलेल्या कामाची माहिती प्रसार माध्यमांना देणे क्रमप्राप्त आहे.त्यामुळे च कामाचा प्रचार आणि प्रसार होऊन भाविकांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि गैर सोय होणार नाही.असे मत रेणुका देवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एकनाथ बांगर यांनी व्यक्त केले.

माहूर येथे श्री रेणुकादेवी संस्थान येथील शारदीय नवरात्र महोत्सव २०२२ निमित्य माहूर येथील सर्व शासकीय विभागाची श्री रेणुकादेवी संस्थान मंदिर प्रशासनासह महत्व पूर्ण आढावा बैठक आज दिनांक २२ रोजी श्री रेणुका मंदिर परिसरात शारदीय रेणुका देवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एकनाथ बांगर,जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, संस्थांनचे पदसिद्ध सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,निवासी जिल्हाधिकारी कुलकर्णी, संस्थानचे उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार डोंगरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

या बैठकीत प्रत्येक विभागा मार्फत यात्रा नियोजना साठी केलेल्या नियोजनाची माहिती घेण्यात आली. राज्य परिवहन मंडळ तर्फे नवरात्र उत्सव काळात १०० बसेस ची व्यवस्था ठेवण्यात येणार आहेत. नवरात्र उत्सवा दरम्यान खाजगी वाहनांना गडावर जाण्यास प्रतिवर्षीप्रमाणे प्रतिबंध करण्यात आले असून भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहन तळापासूनच रापमच्या बसेस ची व्यवस्था करण्यात आली आहे.या शिवाय रापम चे ५ वाहतूक नियंत्रक हे टी पॉइंट,दत्तशिखर – अनुसया, पेट्रोल पंपा समोर अशा वाहतूक नियंत्रण कक्षातून विशेष खबरदारी घेणारे आहे.अशी माहिती आगार प्रमुख चंद्रशेखर सम्मलवाड यांनी दिली.तर आरोग्य विभाग तर्फे देवदेवेश्वर संस्थान,रेणुकामाता मंदिर गडावर, दत्तशिखर,अनुसयामाता मंदिर असे आरोग्य पथक तैनात करण्यात येणार आहे.,रेणुकामाता मंदिर गडावर,व दत्तशिखर संस्थांना वर २४ तास तीन तज्ञ डॉक्टर व रुग्ण वाहिके सह सेवा पुरविण्यात येणार आहे.या शिवाय माहूर च्या ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांचे अतिदक्षता विभाग व विविध आजाराचे तज्ञ डॉक्टर उपस्थिती राहणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिक्षिका झिंगे मॅडम यांनी दिली.तर तालुका आरोग्य विभाग तीन रुग्णवाहिका, ८० आरोग्य कर्मचाऱ्यांचा सज्ज राहणार असून २० डॉक्टर ४० नर्स व २० इतर कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.विद्युत वितरण कंपनी तर्फे यात्रा काळात विजेचा लपंडाव होणारच नाही याची शाश्वती देण्यात आली नसली तरी किनवट व गुंज जंगल परिसरातून होणारा विद्युत पुरवठा अखंडित रहावा म्हणून खबरदारी घेण्यात येणार आहे.असे अभियंता कोटे यांनी सांगितले.आपत्कालीन सेवा पुरविण्यात यावी म्हणून क्रेन,जेसीबी ची व्यवस्था करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता झरीकर यांनी सांगितले. मुख्याधिकारी राजकुमार राठोड यांनी यात्रा काळात पाच ठिकाणी पार्किंग व्यवस्था त्यापैकी तीन ठिकाणी चार चाकी व भारी वाहने आणि दोन ठिकाणी दुचाकी वाहनाचे पार्किंग पॉईंट निर्माण केले जाणार आहे,शिवाय पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि शुद्ध पेयजल व्यवस्था करणार असल्याचे सांगत अग्निशमन दल तीन ठिकाणी फिरते स्वच्छालय व लघुशंकाग्रह चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे आणि गडावरील व्यापारी व नागरिकांशी झालेल्या बैठकीनंतर शहरात प्लास्टिक बंदी झाल्याने हा नवरात्र महोत्सव हरित नवरात्र उत्सव म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती दिली.

तर संस्थान चे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सकाळी ५ ते रात्री १० वाजे पर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले राहणार असल्याने रात्री च्या वेळी माहूर शहरात स्वच्छता कर्मचारी वाढवून स्वच्छतेची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या.जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी माहूर शहरात स्वच्छतागृहाची असलेल्या कमतरते बाबत खेद व्यक्त करत देवीचा उत्सव असल्याने महिला भाविकांची गर्दी लक्षात घेता उपाय योजना आखण्यात याव्यात, विविध विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय रहावा या साठी एक व्हॉटसअप ग्रुप तय्यार करून भाविका अधिकाधिक सुविधा पुरविण्याचा दृष्टिकोनातून सर्वांनी मिळून काम करावे असे सांगत संपूर्ण जिल्हाभरात हरित गणेश उत्सव साजरा होत असताना केवळ माहूर शहरात आम्ही ठरवलं तेच करणार…. आम्ही डीजे लावणारच असा हट्ट धरल्याने केवळ माहूर शहरात हरित गणेशत्सोव साजरा होऊ शकला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपनगराध्यक्ष नाना लाड, सामाजिक कार्यकर्ते विजय आमले ,वसंतराव कपाटे सरफराज दोसानी, अभियंता आकाश राठोड यांनी नवरात्र काळात करण्यात येणाऱ्या उपायोजना आणि मागील काळात झालेली गैरसोय या संदर्भात आपले मत व्यक्त केले. सदर बैठकीचे संचलन नगरपंचायत चे कार्यालयीन आधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी तर आभार विस्वस्थ चंद्रकांत भोपी यांनी व्यक्त केले.या वेळी शारदीय नवरात्र महोत्सव २०२२ च्या कार्यक्रम पत्रिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार किशोर यादव, पोलीस निरीक्षक नामदेव रिठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णा साहेब पवार, रेणुका देविसंस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव,विनायक फांदाळे,अरविंद देव,बालाजी जगत,दुर्गादास भोपी,आशिष जोशी, छायाचित्रकार बालाजी कोंडे,व्यापारी,पत्रकार,गावकरी मंडळी उपस्थित होते .