माहूर:- नांदेड जिल्ह्यातील माहूर तहसील मधून सर्व पक्षीय तक्रारी ने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे बदली होऊन गेलेले तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर पुन्हा वादग्रस्त ठरले आहेत. त्या मुळे संग्रामपूर तालुक्यातील तलाठी मंडळ अधिकारी संपावर गेले आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे,असे तलाठी संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
संग्रामपूर येथील तहसीलदार वरणगावकर जनतेसमोर तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याबाबत अपशब्द वारंवार वापरत आहेत. तसेच मानसिक त्रास देऊन खच्चीकरण करत आहेत. त्यामुळे विदर्भ पटवारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देऊन तलाठी व मंडळ अधिकारी संपावर गेले आहेत.विशेष म्हणजे संघटनेने दिलेल्या निवेदनात माहूर तहसील कार्यालयात असतानाही तेथील तलाठी व कर्मचाऱ्यांबाबत अपशब्द वापरत होते, असेही नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर मंडळ अधिकारी चामलाटे, राऊत, तलाठी विनोद भिसे, देवीदास जाधव, रंगडळ, गाडे, कुसळकर, पागोरे, चव्हाण, खेडकर, जगताप, कस्तुरे, पालकर, डाबरे, बोडखे, नलावडे यांच्यासह तलाठ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
_______________
तलाठ्यांचे सामूहिक रजा आंदोलन!
तहसीलदार यांच्या बेजाबदारपणाच्या
वागणुकीमुळे तलाठी मंडळ अधिकारी यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. म्हणूनच १९ सप्टेंबर पासून तलाठी मंडळ अधिकारी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. दुसरे दिवशी सुद्धा तलाठी मंडळ अधिकारी यानी दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकून काम बंद आंदोलन केले. तर जोपर्यंत तहसीलदार वरणगावकर यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत सामुहिक रजा आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार संग्रामपूर तालुका तलाठी मंडळ अधिकारी संघटनेने व्यक्त केला आहे.
_______________
तहसीलदार हे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांबाबत जनतेसमोर अपशब्द बोलत असून अपमानास्पद वागणूक दिली आहे. त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत तालुक्यातील सर्व तलाठी सामूहिक रजेवर जात आहेत.
एस.एस. रंगदळ,
तालुकाध्यक्ष,विदर्भ पटवारी संघटना