राज्यात लम्पी स्किन आजाराचे थैमान;माहूर शहरातील मोकाट जनावरे प्रशासना कडून दुर्लक्षित!

माहूर:- सध्या महाराष्ट्रात लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भावाने हाहाकार माजविला आहे.एकीकडे पशुसंवर्धन विभागाकडून लम्पी आजार नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातायेत,तर दुसरी कडे माहूर शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे.या शेकडो मोकाट जनावरा पैकी एखादे जनावर लम्पी स्किन आजाराणे ग्रासले तर याचा प्रादुर्भाव झपाट्याने होऊन प्रसार झाला तर याला प्रशासनाची डोळेझाक कारणीभूत ठरेल यात शंका नाही.
लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे.लम्पी स्किन आजार हा कीटकांपासून पसरतो.त्या मुळे पशुधन विभाग गावा गावात जाऊन जनजागृती करीत आहे,मात्र माहूर शहरात किनवट माहूर राष्ट्रीय राज्य मार्गावर शेकडो मोकाट जनावरे दिवस रात्र ठिय्या मांडून बसलेले असतात. त्याचा त्रास पदरचाऱ्यांसह वाहन चालकांना असून अनेक वेळा नागरिकांनी लेखी व तोंडी तक्रारी करून सुद्धा नगरपंचायत प्रशासन यावर उपाय योजना आखत नसल्याने वाहतुकीस अडथळा तर निर्माण होतच आहे दुसरीकडे लम्पि स्किन आजाराचा धोका मात्र वाढला आहे.ही बाब प्रशासनाला अवगत नाही असे नाही, माहूर नगरपंचायत च्या मुख्याधिकाऱ्यासह तहसीलदार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या सर्वांची वाहने याच मार्गाने त्यांच्या कार्यालयात जातात मात्र यावर उपाययोजना करण्याऐवजी त्यांनी डोळे झाक चालविल्याने जनावरांचा रस्त्यावरील ठिय्या आंदोलन मागील अनेक दिवसापासून आजही कायम आहे. विशेष म्हणजे दिनांक १२ सप्टेंबर रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ग्रामीण रुग्णालय माहूर येथे “शारदीय नवरात्र महोत्सव” निमित्त आढावा बैठक घेण्यात आली.सदर बैठकीत तहसीलदार, जिल्हाशल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच सर्व खाते प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही बैठक माध्यमांच्या प्रतिनिधींना डावलून झाल्याने सदर बैठकीमध्ये शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत नेहमी प्रमाणे सूचना देण्यात आल्या असतील तरी ही गत एक महिन्या पूर्वी संपन्न झालेल्या नारळी पौर्णिमेच्या यात्रेत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे राहिलेल्या अनेक तुरट्या ज्यामुळे भाविकांना व नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता, त्याबद्दल चिंतन तरी प्रशासनाच्या जवाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून झाले की नाही हे कळू शकले नाही. दिनांक १२ रोजी झालेल्या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी पुजार यांच्या समोर मोकाट जनावरांचा विषय चर्चिला गेला असता तर नगर पंचायत प्रशासना कडून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलली गेली असती मात्र हा प्रश्न उपस्थिती करण्याचे अवदर्य बैठकीत उपस्थितापैकी कदाचित कोणीही केले नसावे म्हणून मोकाट जनावरांचा प्रश्न आजही कायम आहे.