हेरिटेजवॉक’ ने माहूर शहरातील इतिहासाच्या पाऊलखुणाना उजाळा!

माहूर:- पंचायत समिती माहूर अंतर्गत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आज दिनांक १६ रोंजी पंचायत समिती माहूर ने हेरिटेजवॉक चे आयोजन केले होते .या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी माहूर शहराला लाभलेल्या ऐतिहासिक वारसा सदर्भात माहिती दिली.गट विकास अधिकारी सुरेश काबळे यांनी माहूर च्या वारसाच्या वैभवा सह संवर्धना सोबत पर्यटका पर्यंत पोहचविण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
माहूर शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असून विविध प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत.ही बाब हेरून पंचायत समिती माहूर कडून आज शुक्रवारी सकाळी ७ वाजता टी पॉइंट ते मातृतीर्थ पर्यंत हेरिटेजवॉक चे आयोजन करण्यात आले होते.या वेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, सहाय्यक गट विकास अधिकारी अरबडवार, गटशिक्षणाधिकारी संतोष षटकार,यांच्या सह आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी रमेश गावंडे,मुख्याध्यापक एस.एस पाटील,सुधीर जाधव यांच्या सह पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होती.