माहूर(सरफराज दोसानी):- गेल्या आठ दिवसांपासून धडाडणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोफा आज थंडावल्या. येत्या १८ सप्टेंबर रोजी आता मतदान होणार असल्याने जास्तीत जास्त मतदान मिळवण्यासाठी उमेदवारांनी सेटिंग्ज सुरू केली आहे. त्यात त्यांना कितपत यश मिळतं हे निवडणूक निकालानंतरच समजेल. रविवारी मतदान होणार असल्याने अधिकाधिक मतदान मिळवण्यासाठी आता उमेदवारांसाठी उद्या शनिवार ची रात्र “जागते रहो’ च्या भूमिकेत राहणार आहे.


प्रचाराच्या तोफा थंडावल्या….
ग्रामपंचायत रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून १८ रोजी प्रत्यक्षात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार प्रचाराच्या जाहीर तोफा शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता थंडावल्या आहेत. उमेदवारांनी विजयासाठी होम टू होम प्रचार केला असून त्या उमेदवारापेक्षा मीच कसा चांगला आहे. आणि गावचा विकास कसा करु शकतो हे पटवून सांगण्यासाठी उमेदरांची दमछाक होत आहे. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून विरोधकांना टोमणे मारत यंदा सत्ता आपलीच असा जयघोष करत सरपंचपदावरही आपणच बसणार असल्याचे सोशल मिडियाच्या माध्यामातून जाहीरही करुन टाकले आहे.
