युवकांचे हृदयस्थान…. कार्य कुशल नेतृत्व कपिल नाईक!

सामाजिक व राजकीय चळवळ ही निरंतर चालणारी एक समाजशील आणि संवेदनशील अशी प्रक्रिया आहे.या प्रक्रियेत स्वाभाविकच काही संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारी व्यक्ती मिळतात. किनवट – माहूर विधानसभा मतदारसंघात सत्तत मागील १५ वर्षे नेतृत्व केलेले माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या कार्याचा वसा जपत त्यांचे पुत्र कपिल नाईक यांनी युवकांना व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी व समाजाचे ऋण फेडण्यासाठी राजकीय व सामाजिक चळवळीची धगधगती मशाल हाती घेऊन राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपली पकड मजबूत करत युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा युवा नेता म्हणून आपली ओळख निर्माण करून युवकांचे प्रेरणास्थान ठरत आहे.सर्वांचा आदर करणारे व कार्य कुशल युवा नेतृत्व कपिल नाईक यांचा आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी वाढदिवस….

राजकारणाच्या पलिकडे जाऊन स्वतःची वेगळी छबी निर्माण करणारे युवकांचे हृदय स्थान कपिल नाईक यांच्या पाठीशी फार मोठे राजकीय आणि सामाजिक कार्याचे वलय आहे.अंत्यत संयमी आणि तितकेच सुस्वभावी कपिल नाईक कितीही मोठे वादळ आले तर त्यात न डगमगता खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व आहे. आणि आनंदाची कितीही मोठी ओहटी आली तरी ती तितक्याच संयमाने झेलणारे बंधुत्वाचे गोड नातं जपणारे नाव आहे. त्यांचा राजकीय व सामाजिक कारकीर्दचा पिंड आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासुन किनवट – माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार प्रदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांपैकी एक मोठे नेते आहेत.त्यांचे चिरंजीव कपिल नाईक सुद्धा मागील १० ते १२ वर्षापासून कार्यकर्ता म्हणुन पक्षाच्या कामात सक्रीय सहभागी असल्याने कपिल भाऊंचे संघटन कौशल्य आपण जाणतो आहोत. याच संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी अनेक मित्र व सवंगडी मिळवले आणि ते जपले हे नव्याने सांगण्याची गरज नाही. नेत्रदान हेच श्रेष्ठ दान या उक्ती ला सार्थ करण्या करिता युवकांचे प्रेरणास्त्रोत युवा नेते कपिल नाईक यांनी मागील ४ वर्षा पूर्वी २०१८ मध्ये आपल्या वाढदिवसा निमित्याने भव्य नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मा वाटप कार्यक्रम आयोजित करून हजारो गरजूंना चष्मे वाटप केले आहे.केवळ राजकीय घराण्यात जन्माला येवून कर्तुत्वान होता येत नाही तर, त्यासाठी राजकिय घराण्याची समाजसेवेची परंपरा कृतीतून सिध्द करावी लागते, हे कपिल नाईकांनी आपल्या अलौकिक आणि अजोड कर्तुत्वाने सिध्द केले आहे….जन्मदिना निमित्तं त्यांना उदंड निरोगी दिर्घ आयुष्याच्या व त्यांच्या भावी राजकीय सामाजिक वाटचालीस मनस्वी शुभेच्छा….

शब्दांकन – सरफराज दोसानी माहूर)