माहूर(सरफराज दोसानी):- विविधतेत एकता हे या देशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.शतकानुशतके विविध संस्कृती आणि धर्माचे लोक येथे राहतात. आजकाल काही शक्ती या देशाची ओळख पुसून टाकू इच्छित आहेत,परंतु शतकानुशतकांच्या परंपरेला ते पराभूत करू शकत नाहीत.असे मत हजरत मौलाना उस्मान कासमी यांनी व्यक्त केले.


या वेळी बोलताना प्रा.राजेंद्र केशवे म्हणाले की,स्वतंत्र भारत हा समान हुतात्मा, समान वारसा असलेला लोकशाही समाजवादी धर्मनिरपेक्ष देश आहे. डॉ.आंबेडकरांनी देशाच्या राज्यघटनेत सर्व धर्म,पंथाच्या लोकांना अभिव्यक्तीचा,पूजा करण्याचा,उपासनेचा अधिकार मिळाला आहे.मात्र संविधान च काहीना मान्य नसल्याने संविधान वाचविण्याची आपल्यावर दुर्दैवी वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.तर बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, खाजगीकरण, द्वेष, उन्माद या मुद्द्यांपासून विचलित होऊन देशात भीती पसरवली जात असल्याचे सांगत परस्पर प्रेम, शांतता, सौहार्द,बंधुता,सामाजिक सलोखा, देशभक्ती, देशाची एकता,अखंडता, सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यावर मनोज कीर्तने, कोम्रेड शंकर सिडाम, डॉ.बाबा डाखोरे, दिगांबर जगताप,राजकुमार भोपी, जयकुमार अडकिने,हाजी कादर दोसानी,मेघराज जाधव,या वक्त्यांनी भर दिला.या शिवाय एका आवाजात सद्भावना जपण्याचा संकल्प परिषदेत करण्यात आला.तर आयोजित सद्भावना संसदेत सर्व विविध धर्म व विचारांच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मता आणि शांततेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ मोफिक यांनी तर आभार तालुकाध्यक्ष मौलाना सना यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत ने झाली.
