रेणुका कृषक सेवा सहकारी संस्थेच्या चेअमनपदी राष्ट्रवादी चे मेघराज जाधव यांची बिनविरोध निवड !

माहूर:-रेणुका कृषक सेवा सहकारी संस्थेच्या चेअमनपदी राष्ट्रवादी च्या मेघराज जाधव यांची दुसऱ्यांदा तर काँग्रेस चे दत्तात्रय शेरेकर यांची व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी रेणुका कृषक सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळाची सभा सहनिबंधक सी. एस.मगर यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती. नियोजित सभेत रेणुका सेवा सहकारी सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित नवनिर्वाचित चेअरमन व व्हाइस चेअरमन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे सचिव रत्नपाल मोतेराव यांनी नवनियुक्त कार्यकारणीतील पदाधिकारी सदस्यांचा यथोचित सत्कार सन्मान करून शुभेच्छा दिल्या.यावेळी नवनियुक्त संचालक रावजी नथु राठोड,शेख तुराब शेख रहिम,उध्दव आनंदराव जगताप, तुळशीराम दामा राठोड राजु एकनाथ सौंदलकर,भारत किसन बेहरे, म.उस्मान म. युसुफ, मनोज मुकिंदा किर्तने,नम्रता मनोज किर्तने,पंचफुलाबाई गोविंद मगरे,गणेश बळीराम जाधव यांची उपस्थिती होती.मेघराज जाधव यांच्या निवडी बद्दल त्यांना राजकीय,सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक, सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.