मनसेच्या सदस्य नोंदणीला जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद!

यवतमाळ ( हरीश कामारकर) :आगामी महानगरपालिका, नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती व इतर निवडणुकांच्या अनुषंगाने नुकताच दिनांक २३ ऑगस्ट रोजी मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. सद्यस्थितीतील राजकीय घडामोडी व इतर विषयांवर भाष्य करत असतानाच राज ठाकरे यांनी पक्षाच्या सदस्य नोंदणीचे आदेश पदाधिकाऱ्यांना यावेळी दिले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुभहस्ते झाला. पक्षाच्या पुणे मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे यांनी क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाईन अर्ज भरून पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व घेतले.याच अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ऑनलाईन पद्धतीने मनसेची प्राथमिक सदस्यत्व नोंदणी केले. आज सकाळी १०. ०० वाजता पासुन वणी येथील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयातून ऑनलाइन लिंकचे अनावरण झाल्यानंतर मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी मोबाईल लिंक द्वारें आपला अर्ज भरून आपले प्राथमिक सदस्य नोंदणी केले. याच बरोबर आज दिवसभरात यवतमाळ जिल्ह्यातील हजारो युवक व युवतीने पक्षाचे सदस्यत्व स्वीकारल्याची माहिती मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी दिली.आगामी होऊ घातलेल्या सर्व निवडणुकांकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून चांगलीच कंबर कसली असून यात राज ठाकरे यांनी दिलेल्या नवीन उपक्रमाला पक्ष संघटन बांधणीला बळकटी मिळेल.


अशी करु शकता मनसे पक्षाची सदस्य नोंदणी


मनसेचे प्राथमिक सदस्य बनण्यासाठी पक्षाकडून जारी करण्यात आलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यावर किंवा 8860300404 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर तुमच्या मोबाईलवर https://hindavi-nondani.in ही लिंक येईल. त्या लिंकवर क्लिक केल्यावर जो अर्ज येईल तो भरल्यानंतर तुम्ही मनसेचे प्राथमिक सदस्य बनू शकता.


“मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक ” मनसेचे नव घोषवाक्य


राज्यातील सत्तांतर नाट्य नंतर शिवसेना आत्मचिंतनात व्यस्त असल्याने शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा धुसर होत चाललेला आहे. ही नामी संधी हेरण्या करीता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “मी हिंदू रक्षक मी महाराष्ट्र सेवक” अशी नवी घोषणा देऊन महाराष्ट्रातील हिंदूसह मराठी माणसाला साद घातल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुका मनसेला हिंदू मताचा किती फायदा होईल ते पाहणं औत्सुक्याचे ठरेल.