अध्यनात तंत्रज्ञानाया सदुपयोग व्हावा:- गटशिक्षण अधिकारी संतोष शेटकर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न!

माहूर:- संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे.जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जातात.विद्यार्थ्यांनी अध्यनात तंत्रज्ञानाया सदुपयोग करावा असे प्रतिपादन माहूर चे गटशिक्षण अधिकारी संतोष शेटकर यांनी केले.
आज दिनांक २५ गुरुवार रोजी शिक्षणाधिकारी कार्यालय माहूर च्या वतीने आयोजित ४९ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन श्री जगदंबा हायस्कूल माहूर येथे तहसीलदार किशोर यादव, गट विकास अधिकारी सुरेश कांबळे,   राजकुमार भोपी,प्रा.आनंद वानखेडे, यांच्या प्रमुख उपस्थितीथ संपन्न झाले.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सुंदर नियोजन केल्याने शिक्षण विभागाचे कौतुक करत माहूर सारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारचे विज्ञान प्रदर्शन घेतल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन प्रयोगाची,कल्पकतेची संधी विद्यार्थ्यांना मिळते असे मत गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन पुढील काळामध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये नवनवीन संशोधनाची गोडी निर्माण होते असे ही ते म्हणाले.या प्रदर्शनात तालुक्यातील ५० शाळांनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमाचे संचालन विश्वास जाधव यांनी तर प्रास्ताविक संजय खडकेकर, तर आभार भरत विराळे यांनी मानले.