आदिवासी जमीन हस्तांतरित झाली असल्यास आदिवासी व्यक्तींना त्यांची जमीन परत मिळविण्या साठी अर्ज करा ;- सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

किनवट : महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम १९७४ च्या कलम ३ नुसार आदिवासी जमीन हस्तांतरित झाली असल्यास आदिवासी व्यक्तींना त्यांची जमीन परत मिळविण्याच्या अनुषंगाने दि. ०७/०९/२०२२ पर्यंत अर्ज स्वीकारण्या करीत मोहीम आयोजित करण्यात आली असून सदर मोहीम कालावधीत तहसील कार्यालय किनवट व माहूर तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट येथे अर्ज करता येईल अशी माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.

आदिवासी जमीन बिगर आदिवासी व्यक्तीकडे सक्षम प्राधिकारी यांची परवानगी न घेता (अदलाबदली/ खरेदी विक्री/ दानपत्र / बक्षीसपत्र/ भाडेपट्टा इ.) अन्वये हस्तांतरित झाली असल्यास, किंवा आदिवासी जमीन आदिवासी व्यक्तीकडे सक्षम प्राधिकारी यांची परवानगी न घेता (अदलाबदली/ खरेदी विक्री/ दानपत्र / बक्षीसपत्र/ भाडेपट्टा इ.) अन्वये हस्तांतरित झाली असल्यास,आदिवासी व्यक्तींना त्यांची जमीन परत मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे अहवान सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकीरण पुजार यांनी केले आहे.या संबंधी अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी नायब तहसीलदार एन.ए. शेख (९७३०२८२७०२), के.डी. कांबळे (९५७९१३१९०२), एन.एस. पवार (८८०६२७८३७९), व एस. जी.मुंडे (९०७५१३२९६९) यांच्याशी संपर्क करण्याचे पत्रका द्वारे कळविण्यात आले आहे.