माहूर नगर पंचायतीच्या प्रभारी मुख्याधिकारी पदाचा पदभार नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांनी स्वीकारला!

माहूर:- माहूर नगर पंचायतीचा कारभार मागील दीड ते दोन वर्षापासून प्रभारी च्या भरवश्यावर आहे.त्यात मागील सहा महिन्यापासून माहूर चे तहसीलदार किशोर यादव यांच्या कडे मुख्याधिकारी नगरपंचायत माहुर या पदाचा पदभार अतिरिक्त स्वरुपात सोपविण्यात आला होता. काल दिनांक २३ रोजी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी प्रशासकीय कारणास्तव मुख्याधिकारी, नगरपंचायत माहूर या पदाचा पदभार अतिरिक्त स्वरुपात नायब तहसिलदार राजकुमार राठोड यांचेकडे देण्यात येत असल्याचे आदेश काढले.आज बुधवार दिनांक २४ रोजी नायब तहसिलदार राजकुमार राठोड यांनी मुख्याधिकारी पदाची सूत्र स्वीकारली.या वेळी नगर पंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष फिरोज दोसानी व नगर सेवक,अधिकारी,कर्मचारी यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

माहूर नगर पंचायतीत कायम स्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत.त्यातच मागील सहा महिन्यात नगर पंचायत प्रशासनाची ही घडी बद से बद्दतर झाली होती.बहुदा नागरिकांच्या वाढत्या तक्रारी ची दखल घेऊन जिल्हाधिकारी नांदेड यांनी नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांच्या कडे सोपविला असावा.येत्या आठवड्यात पोळा, गणेश उत्सव व काही दिवसांवर नवरात्र उत्सव येत असल्याने शहरातील विविध समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे.त्यांच्या कडे या पूर्वी असलेला सांगली जिल्ह्यातील आठपाडी येथील मुख्याधिकारी पदाचा अनुभव माहूर शहराच्या विकासा साठी कामी पडणार आहे,यात शंका नाही.

माहूर नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छोटेखानी सत्कार समारंभ कार्यक्रमा ला उपनगराध्यक्ष नाना लाड,सभापती अशोक खडसे,विजय कामटकर, नगरसेवक राजेंद्र केशवे,नगर सेवक प्रतिनिधी रफिक सौदागर,देविदास सिडाम, इरफान सय्यद,निसार कुरेशी,राजू सौंदलकर,शिवसेना शहरप्रमुख निराधारी जाधव,सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील हडसनीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.सत्काराला उत्तर देताना नूतन मुख्याधिकारी राजकुमार राठोड यांनी शहर विकासा साठी अधिकाधिक वेळ देऊन सर्वांच्या सहकार्याने समस्यांचे निराकरण करून माहूर तीर्थक्षेत्राला साजेशे स्वरूप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.संचलन कर्यालाइन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी तर आभार अभियंता प्रतीक नाईक यांनी मानले.या वेळी पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, उपस्थित होते.