माहूर:- अनेक जण सोशल मीडियाच्या आहारी जात असून त्याचा दुरुपयोग करत असल्याचे समोर येत आहे.सोशल मीडिया हे एक स्फोटक यंत्र आहे.त्यातून व्हायरल केलेले चुकीचे संदेश सामाजिक प्रश्न निर्माण करू शकतात.त्या मुळे सोशल मीडिया जपून वापरा, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअॅप, व व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर व अफवा पसरविणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कुमार डोंगरे यांनी दिला.


गणेशोत्सवाची आतुरता सर्वदूर सुरू झालेली आहे. यातच माहूर तालुक्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होण्याचे संकेत दिसत आहे. आणि यामुळेच गणेश भक्तांचा उत्साह हा खरोखर द्विगुणित झालेला आहे. मात्र,यानिमित्ताने प्रशासनाची जबाबदारी ही वाढली आहे.नेहमीप्रमाणे यंदाचे ही गणेशोत्सव उत्साहात व शांततेत संपन्न व्हावे,या साठी पोलीस विभागाकडून मंडळांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.त्यात न्यायालयाच्या निर्णयानुसार डीजेचे डेसिबल,मिरवणूक वेळेचे बंधन,आवश्यक त्या परवानग्या घेण्याच्या सूचना पोलीस विभागाकडून करण्यात आल्या.या सह सोशल मीडियावरून उठणारे वादंग आणि क्षणातच पसरणाऱ्या अफवा या बाबत मंडळांनी,गणेश भक्तांनी व सर्व धर्मीय नागरिकांनी जागरूक राहून शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी असे अहवान उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार डोंगरे यांनी केले.गणेश मंडळाकडून विनोद सूर्यवंशी, व विकास कपाटे यांनी मिरवणूक मार्गावरील विद्युत वितरण कंपनीचे येणारे अनेक अडथळे,मिरवणुकी दरम्यान बंद असणारा विद्युत पुरवठा या बाबत नाराजी व्यक्त केली, तर रस्त्यावर पडून असलेले बांधकाम साहित्य,व रस्त्यावरील खड्ड्या बाबत नगर पंचायतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.शांतता समितीच्या आढवा बैठकीला मुख्याधिकारी गैरहजर असल्याने त्यांनी आम्ही आमचे दुखणे कोणाकडे सांगावे असे म्हणत मिरवणुकीचे गांभीर्य नसलेल्या मुख्याधिकारी तथा तहसीलदार यांच्यावर रोष व्यक्त केला.या वेळी सरफराज दोसानी, विजय आमले,जय कुमार अडकिने,पद्मा गिऱ्हे यांची समयोचीत भाषणे झाली.या बैठकीला पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक,गणेशोत्सव समिती व मंडळाचे पदाधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य व पोलीस बांधव उपस्थित होते.
