वाई बाजार येथील उमूमी इस्तेमा मध्ये सहभागी हजारो मुस्लिम बांधवांनी केली विश्व शांती साठी प्रार्थना!

वाई बाजार(अमजद पठाण)माहूर तालुक्यातील उमूमी इज्तेमा
( मुस्लिम बांधवांचा धार्मिक संमेलन ) हे आज दिनांक 21 ऑगस्ट रविवारी रोजी वाई बाजार येथील जामा मस्जिदमध्ये माहूर मरकज चे अमीर म.नसीर भाई सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.या वेळी माहूर किनवट तालुक्यातीलच नव्हे तर नांदेड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून हि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या संमेलनाला दाखल झाले होते,या संमेलनादरम्यान वाई बाजार येथे नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य जामा मस्जीत इमारतीचे उद्घाटन समाजातील विद्वान मौलवी व प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी मस्जिद वर केलेल्या तिरंगा रंगाच्या सजावटी चे व मस्जिदिची इमारत पाहून बाहेर गावावरून आलेल्या समाज बांधवांकडून जामा उपस्थितां मध्ये तो खास चर्चेचा विषय होता.

वाई बाजार येथील जामा मशिदीची देखणीय व भव्य इमारत हे सदर हाजी उस्मान खान यांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आली असून यासाठी एक कमिटी नेमण्यात आली होती.आणि त्या कमिटीने जामा मस्जिदि च्या संपूर्ण कामकाजाची जबाबदारी स्वीकारली होती,कमिटीमध्ये जबाबदार, व्यक्ती फारूक अजीज अकबानी,अन्वर खिचीसह,स्थानिक समाजातील अनेक तरूणांचा हि समावेश होता.व जामा मस्जिद उभारण्यासाठी गावातील समाज बांधवांनी, पुढाकार घेऊन आर्थिक व शारीरिक योगदान दिले,आज रविवार रोजी झालेल्या उमूमी इस्तमामध्ये समाजामधील विद्वान धर्मगुरू मौलवी, यांच्याकडून पवित्र कुरणामधील अध्यायाचे पठण करण्यात आले,व प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी केलेला उपदेशाचे आचरण करण्यास प्रयत्नशील राहावे असे सांगण्यात आले असून यावेळी विश्व शांती साठी प्रार्थना करण्यात आली.या उमूमी इजतमामधून धर्म प्रचारासाठी २४ जमाती निघणार असल्याचे समजते.