कृषी मंत्र्यांचा दौरा नेमका कोणासाठी?

यवतमाळ ( हरीश कामारकर) कित्येक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर राज्याला स्थिर सरकार मिळाल्याने सामान्यांना व शेतकऱ्यांना आपल्या अडीअडचणी सोडविण्यास तीव्रता लाभेल अशी आशा लागली होती. याच दरम्यान नुकताच विस्तारित झालेल्या मंत्रिमंडळाने आणि खाते वाटपाने बहुतांश विभागाला मंत्री लाभलेत, तर ग्रामीण भागातील मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या कृषी विभागाला पहिल्याच टप्प्यात अब्दुल सत्तरा सारखा ग्रामीण भागातील मंत्री लाभला. सतारांसारखा ग्रामीण भागातील कृषिमंत्री लाभल्याने आपल्या अडीअडचणी आणि समस्या शासन दरबारी सुटतील ही अपेक्षा होती. जिल्ह्यात झालेल्या तीवृष्टीने अनेक कास्तकारांची पिके निस्तनामूद झाली तर जिल्ह्यातील अनेक हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचं नुकसान झाले त्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई राज्य सरकार अदा करेल असे कास्तकारांना वाटू लागले त्याच दरम्यान राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील झाडगाव येथे नुकतीच पाहणी केल्यानंतर हा प्रश्न विधिमंडळात गाजेल आणि याची दखल घेत त्याच ठिकाणी आज अब्दुल सत्तार यांनी आपली हजेरी लावली परंतु सदर दौरा हा केवळ वांझ ठरल्याने शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा उपेक्षाच पडल्याचे स्पष्ट झाले.


यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावात अनेक हेक्टर शेती पुरामुळे व अतिवृष्टीमुळे खराब झाली आहे व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचं दरम्यान राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे काहीं दिवसापूर्वी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी भेट दिली होती व त्यांनी अधिवेशनात अतिवृष्टीचा मुद्दा उचलला होता. त्यामुळे काल कृषी मंत्री अब्दुल सत्तार व त्यांच्या सोबत आमदार डॉ. अशोक उईके यांनी राळेगाव तालुक्यांतील झाडगावं येथील अतीवृष्टीमुळे खरडून गेलेल्या शेतीची पाहणी केली व नाल्याला संरक्षण भिंत बांधन्याचे नियोजन करावे असे आदेश दिले व अतिवृष्टीचा ज्यांना फटका बसला त्वरीत मदत होईल असे आश्वासन दिले.
जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेत जमिनी पाण्याखाली गेल्याने कास्तकारांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहेत या परिस्थितीत प्रशासनाकडून तोच कारवाई करून तात्काळ मदत जाहीर करण्याची अपेक्षा होती परंतु कृषीमंत्र्यांनी या ठिकाणी केवळ आश्वासनाचा वारेमाप पाऊस पाडला, आणि आपला दौरा गुंडाळत घेतला काल राळेगाव येथील झाडगाव येथे पाणी साठी आलेले सत्ता केवळ दहा मिनिटे या ठिकाणी पाणी करून आपला दौरा गुन्हा घेत पुढे अमरावतीकडे प्रस्थान करून या ठिकाणावरून निघून गेले त्यामुळे सत्तारांचा दौरा नेमका कुणासाठी होता हा संभ्रमाचा प्रश्न उपस्थित होतोय..

मंत्र्याचे दौरे प्रशासनावर ताण, दौऱ्यांच्या नावाने वैयक्तिक भेटीगाठी.

अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी आलेले अब्दुल सत्तार यांचा दौरा नियोजित वेळे आधीच आटोपल्याने नेमका दौरा कोणासाठी होता.? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे. दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजी नियोजित दौरा ठरल्याने अब्दुल सत्तार काल जिल्ह्यात दाखल झाले. परंतु एक दिवसानंतर असलेला दौरा १९ तारखेचा आटोपल्याने उर्वरित वेळेत सत्तारांनी वैयक्तिक भेटीगाठी आणि घेऊन हा दौरा पूर्ण केला. शासकीय दौऱ्याच्या नावावर वैयक्तिक भेटीगाठी घेणाऱ्या सत्तारांमुळे प्रशासनावर अचानक ताण पडल्याने प्रशासकीय यंत्रणेची भांबेरी उडाली होती..कृषी मंत्र्यांचा दौरा राजकीय हेतु पुरस्परअतिवृष्टीमुळे बळीराजाचे कंबरडे मोडले असतांना त्यांना तत्काळ मदतीची गरज आहे.विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी काही दिवसांपूर्वी राळेगाव तालुक्यातील शेतीच्या नुकसानीची पाहणी केली त्यांनी दौरा केल्यामुळेच व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर डोळा ठेवुन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राळेगाव तालुक्यातील नुकसानीची पाहणी दौरा केला त्यांच्या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांना काही तरी पदरी पडेल अशी भाबडी आशा लागली होती परंतु राजकीय हेतुने झालेल्या दौऱ्यामध्ये जगाचा पोशिंदा मात्र उपाशीच राहिला आहे.
:- शंकर वरघट
मनसे जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ