खडका उड्डाण व्यापाऱ्यावर हल्ला चढवून लुटल्याचे प्रकरणी माहूर चे दोन संशयित ताब्यात!

महागाव (हरीश कामारकर):- माहूर तालुक्यातून वसुली करून परत येत असलेल्या महागाव जिल्हा यवतमाळ येथील किराणा व्यापाऱ्यावर हल्ला चढवून त्याच्या लाखो रुपये रोकड असलेली बॅग दिनांक १७ रोजी भर दिवसा लुटण्यात आली होती.या प्रकरणी माहूर तालुक्यातील पडसा येथील दोघां सह अन्य एकाला महागाव पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेत शामील इतर आरोपींचा शोध महागाव पोलीस घेत आहे.विशेष म्हणजे या वाटणारी मधील अडीच ते तीन लाख रुपये पोलिसांनी आरोपी कडून ताब्यात घेतल्याचे समजते.

अनिल शर्मा माहूर तालुक्यात वसुलीसाठी गेले होते. तेथून परत येत असताना खड़का फाट्यानजीक त्यांची दुचाकी आरोपींनी अडविली. त्यांच्या जवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र शर्मा बॅग देत नसल्याचे बघून आरोपींनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला होता. यात शर्मा गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांची जवळपास दहा लाख रुपये असलेली बॅग घेऊन पोबारा केला होता. जखमी अवस्थेत शर्मा जवळपास एक किलोमीटर अंतर चालत गेले.दरम्यान, त्यांना तातडीने प्रथम पुसद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर बुधवारी रात्रीच नागपूर येथे हलविण्यात आले. तेथे गुरुवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. घटने नंतर बुधवारी सायंकाळीच उमरखेड चे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली होती.व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून
महागाव पोलिसांनी सात अज्ञात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.बुधवारी हल्ल्यासह लुटमारीची घटना घडल्यानंतर महागाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चोरट्यांच्या शोधात रवाना झाले. दरम्यान चोरटे माहूर तालुक्यातील वडसा येथे दडून बसल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने वडसा गाठून सात पैकी तिघांच्या मुसक्या आवळल्या त्यात माहूर तालुक्यात दोघांचा तर महागाव तालुक्यातील काळी दौ.येथील एकाचा समावेश असल्याचे कळते. त्यांच्याकडून अडीच ते तीन लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

@@त्या घटनेच्या विरोधात व्यापारी संघटना आक्रमक
आरोपींच्या तत्काळ मुसक्या आवळा अन्यथा बाजारपेठ बेमुदत बंदच ईशारा@@

व्यापाऱ्यावर हल्ला चढवुन लाखो रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आरोपींना तत्काळ जेरबंद करा अन्यथा बाजारपेठ बंद ठेवण्याचा ईशारा महागाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
महागाव येथील किराणा व्यापारी अनिल शर्मा हे वसुली करून परत येत असतांना खडका उड्डाणपुलावर अज्ञात लुटारूंनी त्यांना अडवुन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवुन १०लाख रुपयांची बॅग लंपास केली यामुळे व्यापारी वर्गात धास्ती निर्माण झाली असुन व्यापारी दहशतीमध्ये आहेत.महागाव तालुक्यातील चोरी,लुटमारीचे प्रमाण वाढते असुन तपास मात्र शुन्य असल्याने चोरट्यांचे मनोबल वाढत आहेत. आहे.चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने असुरक्षित वातावरणामुळे व्यापाऱ्यांचे कुटुंब चिंतेत जीवन जगत असल्याने अनेक व्यापारी आपले व्यापार बंद करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आरोपींना तत्काळ जेरबंद करावे,महागाव पोलीस स्टेशनला जादा पोलीस कर्मचारी देण्यात यावेत,महागाव शहरातगेल्या वर्षभरापासुन बंद असलेली दररोज रात्रीची गस्त पुन्हा चालु करावी अशा आशयाचे निवेदन महागाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आले असुन या मागण्या मान्य न झाल्यास येत्या २१ऑगस्टपासून स्वयंस्फूर्तीने बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्याचा ईशारा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे,सुरेश शर्मा,दिपक पाटील राऊत,संजय चिंतामणी,आरिफ सुरैय्या,विजय सुर्यवंशी,अविनाश नरवाडे, दिपक आडे,सुदाम खंदारे,अशोक तुमवार,सुजितसिंह ठाकुर, विशाल पांडे ,मनोज व्यवहारे ,गणेश हिंगडे,स्वप्नील अडकीने,शिवराज ठाकरे यांच्यासह व्यापारी बांधवांनी दिला आहे.