खडका उड्डाण पुलावर महागावच्या किराणा व्यापाऱ्यास जखमी करून लुटले!

यवतमाळ:- लगत च्या नांदेड जिल्ह्यातील सारखणी ,वाई , माहुर, व महागाव तालुक्यातील हिवरा(संगम) या बाजार पेठेतून वसुली करून परत येत असलेल्या महागाव येथील किराणा व्यापाऱ्यावर खडका येथील उड्डाणपुलावर प्राण घातक हल्ला करून त्यांच्याकडील लाखो रुपयांची बॅग घेवुन लुटारू पसार झाले आहे.या हल्ल्यात जखमी झालेल्या  व्यापाऱ्याचे अनिल गंभीरमल शर्मा असे  नाव आहे.आज दिनांक १७ बुधवारी रोजी साडे चार वाजताच्या सुमारास ही गंभीर घटना घडली.

अनिल शर्मा किराणा मालाच्या रकमेची वसुली करण्यासाठी वाईबाजार,माहुर, हिवरा(संगम) येथे दुचाकीने गेले होते. परत येताना खडका उड्डाणपुलावर अज्ञात लुटारूंनी पाळत ठेवून त्यांची मोटरसायकल अडवली व हातावर आणि शरीरावर चाकूचे गंभीर वार करून रकमेची बॅग जबरदस्तीने पळविली. ज्यामध्ये अंदाजे ५ ते ६ लाख रुपये असल्याची माहिती आहे, रोड रॉबरीच्या या घटनेत व्यापारी अनिल शर्मा हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने पुसद येथे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले असून अनिल शर्मा यांची मोटर सायकल व चपला अस्ताव्यस्त पडून आहेत . वृत्त लिही पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.महागाव तालुक्यात चोरी,लुटमार व इतर गंभीर गुन्ह्यांचा आलेख वाढत असुन पोलिसांचा कोणताही वचक गुन्हेगारांवर नसल्याने कायदा व सुव्यवस्थेची घडी पुर्णतः विकस्टलेली आहे.असा आरोप व्यापारी व नागरिकांनी केला आहे.