सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन स्वतंत्र दिनी विद्यार्थ्यांचा गौरव!

माहूर:- देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत त्या निमित्ताने संपुर्ण भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे, त्याच पार्श्वभूमीवर पंचायत समिती माहूर तर्फे तालुकास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धतील सहभागी विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या हस्ते पारितोषिक,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.या वेळी गट विकास अधिकारी एस.जी.कांबळे,नायब तहसीलदार गोविंदवार, सहाय्यक गट विकास अधिकारी आरबडवार,गट शिक्षण अधिकारी संतोष शेटकर, विस्तार अधिकारी राजू मुधोळकर,केंद्र प्रमुख पोलाजी कानोडे,पोपुलवाड, एम.के.घोडसकर यांची उपस्थिती होती.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने पंचायत समिती माहूर च्या वतीने इयत्ता पहिली ते आठ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तीन गटात निबंध स्पर्धा,वकृतत्व स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत २५० विद्यार्थी सहभागी झाले होते,या पैकी तीन गटातील प्रथम,द्वितीय, व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना आज दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या हस्ते पारितोषिक,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.इयत्ता पहिली व दुसरी गटात निबंध स्पर्धा,वकृतत्व स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, व चित्रकला स्पर्धेत सोहम कैलास जाधव,संस्कृती अविनाश बेहेरे,विशाखा विजय भेणे,भाव्या नरेंद्र गुरमुळे,अद्विका अरुण जाधव,श्रीकांत कोठेकर,खुशी संदीप आराध्ये,रिया सुरेश राठोड,आचल अविनाश राठोड,अथर्व राहुल ढवळे,कृष्णा गजानन राठोड,आर्यन अमोल सिडाम,यांनी तर तिसरी ते पाचवी गटात आरुषी अमोल मोरे, आयवा ईश्वर जाधव,सावली देवानंद कांबळे, संस्कृती ज्ञानेश्वर खराटे,निखील मनोज राठोड,बादल गजानन जाधव,संस्कृती ज्ञानेश्वर खराटे,ऋतुजा अमृतसिंह मरमट, मोहिनी दत्ता लेखुळे,नाझमीन शेख इसा, संस्कृती ज्ञानेश्वर खराटे,नोबल रमेश पेटकुले, माहेश्वरी मनोहर टोकाकाटे, ऋतुजा अमृतसिंह मरमट, व सहावी ते आठवी गटात संचिता रिमन जाधव, स्वाती विलास जाधव,खुशी नरेंद्र धुपे,अंजली जीवन सुरोशे,सत्यम पंडित चव्हाण,तन्वी सुभाष गंदमवार, रितिका विनोद आढाव,आरुषी दत्ता राठोड,मेनका मारोती तिळेवार,ख़ुशी नरेंद्र धुपे,शीतल देवराव झाडे,या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय पारितोषिक पटकाविले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षण अधिकारी संतोष शेटकर यांनी तर सुरेख सूत्रसंचलन गट समन्वयक संजय कांबळे यांनी केले.या वेळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक एस.ए.खांडेकर,शैलेश गिऱ्हे,रणजित वर्मा,सूर्यवंशी मॅडम,स्वप्नाली ठाकरे,भावसार,जयश वसुले, राहुल ढवळे, उपरिकर मॅडम, रमेश मोडक यांची उपस्थिती होती.