सर्वधर्म समभावाचा विचार चिरंतन ठेवण्याचा दृढनिर्धार करून शहरातील देशभक्त नागरिकांचा तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग!

माहूर(सरफराज दोसानी):- देशभक्तीसह देशाभिमानाची भावना वाढीस लागावी या उदात्त हेतूने माहूर नगर पंचायत चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या संकल्पनेतून नगरपंचायत च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी – चार चाकी भव्य रॅलीत स्वातंत्र्य, समता आणि सर्वधर्म समभावाचा विचार चिरंतन ठेवण्याचा दृढनिर्धार करून शहरातील देशभक्त नागरिकांना मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने भर पावसात निघालेल्या तिरंगा रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.या वेळी माजी आमदार प्रदीप नाईक,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्योतिबादादा खराटे , उपनगराध्यक्ष नाना लाड,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य हर घर तिरंगा अभियानांतर्गत माहूर शहरातील नागरिकांनी तिरंगा रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केले होते,त्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पावसाची रिपरिप सुरू असताना सुद्धा नागरिकांनी आपापल्या मोटरसायकलवर, व चार चाकी वाहना वर तिरंगा ध्वज लावून भारतमातेच्या उत्स्फूर्त जयघोषात ही रॅली काढली.नगर पंचायत कार्यालयातून निघालेल्या या रॅलीचे बुद्धभूमी परिसर, नवी आबादी, टी पॉइंट,मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात समारोप करण्यात आले.रॅली दरम्यान, ध्वनिक्षेपनात कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी केलेल्या भारत माता की जय, वंदे मातरम् ,घर तिरंगा लहराएंगे अमृत महोत्सव मनाएंगे,च्या जयघोषाने संपुर्ण शहर दुमदुमून गेले होते.
या वेळी शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव, माजी सभापती मारोती रेकुलवार, सभापती अशोक खडसे,विजय कामटकर,बिल्कीस बी अहमद आली,नगरसेवक गोपू महामुने,शकीला बी शब्बीर, आशाताई जाधव,मुसरत फातेमा,नगर सेवक प्रतिनिधी रणधीर पाटील,इरफान शेख,रफिक सौदागर,सुमित खडसे,अपसर आली,निसार कुरेशी,विक्रम राठोड, राजू सौंदलकर,प्राचार्य भगवान राव जोगदंड, माजी उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी, मुनाफ पटेल,अनिल रूनवाल,अमजद पठाण,मोहम्मद हनीफ, विजय आमाले,शहराध्यक्ष अमित येवतिकर, दिनेश कोंडे,संदीप गोरडे,सुरेश आरध्ये,दीपक कांबळे,विकास कपाटे, लाइक सौदागर,दानिश शेख,एजाज खान,लक्ष्मण बेहेरे,सुनील आडे,यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.