माहूर शहरात देशभक्तीचा जागर; स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदाला उधाण!

माहूर:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील स्वातंत्र्यदिन हा भारतीय इतिहासातील ऐतिहासिक दिन ठरणार आहे. या निमित्ताने माहूर नगर पंचायत चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या कल्पनेतून जिल्हाधिकारी,सहाय्यक जिल्हाधिकारी,मुख्याधिकारी, शहरातील तमाम माध्यमांच्या प्रतिनिधींना तिरंगा रंगाचे फेटे व रेशमी धाग्याचे बँड भेट दिले, त्याचबरोबर शहरातील नागरिकांच्या व्हॉट्सअॅपवरील स्टेट्स, डीपीवर तिरंगा झळकू लागला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम याही सोशल माध्यमावर स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सवी आनंद व्यक्त होऊ लागला असल्याने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदाला उधाण आले आहे.
आज दिनांक १४ रोजी येथील स्थानिक विश्राम गृहावर  माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते  नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी आयोजित केलेल्या पत्रकारांचा सन्मान या कार्यक्रमात शहरातील तमाम माध्यमांच्या प्रतिनिधींना तिरंगा रंगाची पगडी भेट देण्यात आली.या वेळी बोलताना प्रदीप नाईक म्हणाले की,’हर घर तिरंगा’ मोहिमेला माहूर शहरात चांगलाच प्रतिसाद मिळाला असून प्रत्येक घरावर तिरंगा फडकल्याने शहर तिरंगामय झाल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरिकांमध्ये देशाभिमान जागृत करण्यासाठी घरोघरी तिरंगा अभियानात माहूर किनवट तालुक्यातील तमाम नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे,असे अहवान केले.या वेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, माजी सभापती मारोती रेकुलवार, नप चे उपाध्यक्ष नाना लाड,शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव,मनोज कीर्तने,कुंदन राठोड, प्रा.भगवान राव जोगदंड,उपसरपंच संतोष रेकुलवार,नगर सेवक प्रतिनिधी रणधीर पाटील,इरफान शेख,रफिक सौदागर,जीवन राठोड,देवी पेंटर,बाजीप्रभू, बालाजी पवार,शहराध्यक्ष अमित येवतिकर, माजी उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी,इलियास बावानी यांची उपस्थिती होती. पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे,विजय अमाले,नंदकुमार जोशी,गजानन भारती,जयकुमार अडकिने यांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांचा यथोचित सत्कार केला..या वेळी शहरातील विविध माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते.