पुस नदी काठावरील नागरिकांनो सावधान ,अधर पुस प्रकल्पाचे १० दरवाजे ५०सेंमी ने उघडले!

यवतमाळ(हरीश कामारकर)-पुस धरणाच्या पाण्याचा वाढता विसर्ग होत असल्याने अधर पुस पुस प्रकल्पातील पाण्याची आवक वाढुन धरण भरले असल्याने अधर पुस प्रकल्पाचे दहा दरवाजे ५०ते७५सेमी ने उचलुन पुस नदी पात्रात ७९०क्युमेंक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा पाटबंधारे विभागच्या वतीने देण्यात आला आहे.


मागील तीन दिवसांपासुन पावसाची संततधार चालुच असल्याने व पुस धरण(पुसद) १००टक्के भरल्याने त्यामधून अंदाजे २मीटर वरून पाण्याचा विसर्ग होत असुन त्यामुळे महागाव तालुक्यातील अधर पुस प्रकल्प(वेणी धरण)मध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.पुढील १तासात आरओएस प्रणाली नुसार धरणाची पातळी मेंटेन ठेवण्यासाठी अधर पुस प्रकल्पाचे दहा दरवाजे ५०ते ७५सेमी किंवा गरज पडल्यास त्यापेक्षा जास्त सेंमी ने वर उचलुन नदी पात्रामध्ये ७९० क्युमेंक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप घोलप यांनी दिली असुन नदी काठावरील गावांतील नागरिकांनी सतर्क राहुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.