नेत्रुत्व आणि कर्तृत्व कुणाकडुन उसने मिळत नाही ते स्वतःच निर्माण करावे लागते,या उक्तीप्रमाणे शुन्यातुन विश्व निर्माण करणारे राजकीय क्षेत्रातील एक पारंगत आणि सर्वांना आपलेसे केलेले सर्वांना हवहवस वाटणार व्यक्तीमत्व,विकासाला केंद्रबिंदु मानुन गेली कित्येक वर्ष जनसेवेचा घेतलेला वसा अविरत आजही अखंडीतपणे सुरू ठेवणारा स्वच्छ मनाचा एक दिलदार माणुस म्हणजेच दिनकर दादा दहिफळे,त्यांचा आज (८ ऑगस्ट) वाढ दिवस!
यश-अपयश या आयुष्यातील अविभाज्य बाजु आहेत, ते जाणुन अपयशाने खचुन न जाता यशाची नवी किनार शोधण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहुन तळागाळातील सर्वसामान्य व्यक्ती सोबत दिनकर दहिफळे यांनी आपली नाळ सदैव जोडुन ठेवली आहे.राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील लोकांना सुध्दा हक्काचा वाटणारा,आपल्या कर्तुत्वाने जनमानसांवर वेगळा ठसा उमटविणारा आणि मैत्री जपणारा,किनवट तालुक्यातील बोधडी – जलधारा सर्कल मधील विकास प्रिय कार्यकर्ता म्हणून दिनकर दादा दहिफळे यांनी गल्ली पासून मुंबई च्या मंत्रालयापर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपल्या राजकीय जीवनाची सुरवात त्यांनी शिवसेना पक्षातून केली होती.मात्र त्यांच्या मधील असलेली शांत,संयमी,मितभाषी, कणखर,कल्पक,आणि अभ्यासू वृत्ती आमदार प्रदीप नाईक यांना खुणावत होती.मा.आ.प्रदीप नाईक यांनी त्यांना राष्ट्रवादी मध्ये सन 2011 मध्ये प्रवेश दिला व लगेच जिल्हा परिषद बोधडी गटासाठी उमेदवारी बहाल करून त्यांच्या वर विश्वास दाखविला. दिनकर दहिफळे हे प्रदीप नाईक यांनी दाखविलेल्या विश्वासावर खरे उतरले आणि त्यांनी ती निवडणूक मोठ्यामोठ्या प्रतिस्पर्धींना धोबीपछाड देत जिंकली.त्या विजयाचे बक्षिस म्हणून मा.आमदार नाईक यांनी त्यांना बांधकाम समितीचे सभापती पद बहाल केले.त्या नंतर च्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकी मध्ये बोधडी जिल्हा परिषद गट महिला राखीव झाल्याने त्यांच्या मातोश्री सुनंदा ओमप्रकाश दहीफळे यांना राष्ट्रवादी कडून प्रदीप नाईक यांनी उमेदवारी दिली व निवडून आणले.आई जिल्हा परिषद सदस्य असल्याने जन माणसाची कामे वेळेवर व्हावी याची अधिकच काळजी दिनकर दहिफळे घेत असत.दरम्यानच्या काळात जिल्हा नियोजन समिती व नंतर नांदेड जिल्हा बँकेची निवडणूक त्यांनी जिंकली,संयमी, स्पष्टवक्तेपणा, मनमिळावू स्वभाव,नागरिकांच्या कामासाठी सदैव तत्पर आणि महत्वाची बाब म्हणजे खर्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारा स्पष्टवक्तेपणा अंगी असल्याने प्रदीप नाईकांनी त्यांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष बनवून कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा पहिल्यांदा वंजारी समाजाच्या या तरुणाला संधी देऊन जिल्ह्यातील राजकारणात प्रदीप नाईक यांनी सोशल इंजिनियरिंग साधत दुरदृष्टीने झपाटुन काम करणारं गतिमान नेतृत्व असलेल्या दहिफळे सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला.
दिनकर दादा यांचा राजकीय प्रवास वाटतो तितका सोपा मुळीच नाही.त्यांचा राजकीय प्रवास एखाद्या संघर्षमय चित्रपटालाही लाजवेल असा अचंबीत आणि थक्क करणारा राहीला असुन अगदी शुन्यातुन सुरू झालेला प्रवास आज यशोशिखरावर जाऊन पोहचलाय… !!! संघर्षाच्या धगधगत्या अग्नीकुंडातून तावुन सुलाखुन निघालेला एक तेजस्वी हिरा…… अगणित विषारी काट्यांचा त्रास सोसुन सर्वाथाने नावाप्रमाणेच जनसामान्यांच्या आयुष्यात प्रकाश टाकणाऱ्या दिनकर दादा दहिफळे यांचे यशस्वी जीवन प्रवास नेहमी आनंद द्विगुणित करून वाटचाल करीत राहो हिच वाढदिवसा निमित्त भरभरून शुभेच्छा.
सरफराज दोसानी
माहूर (नांदेड)