साखर कारखाना चालू झाल्यास शेतकऱ्या सह रोजगाराला चालना मिळेल – संजय देशमुख

यवतमाळ ( हरिश कामारकर)  :  जिल्हयातील दारव्हा तालुक्याकडे सतत दुष्काळी तालुका म्हणून पाहिले जाते. या तालुक्यातील बोदेगाव साखर कारखाना दुर्दैवाने गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. आज या कारखान्याचे कामगार उपाशीपोटी जगत आहेत. मात्र, सध्या दारव्हा तालुक्यात पाण्याचा ओघ वाढल्याने आता या परिसरात ऊस उत्पादन क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे बंद पडलेला जय किसान सहकारी साखर कारखाना नव्याने सुरू झाल्यास तालुक्यातील उसाचे गाळप तालुक्यात होईल आणि अनेक युवक, तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्यामुळे साहजिकच तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल. गत काही वर्षापूर्वीच हा कारखाना चालू झाला असता माञ राजकीय उदासीनता आणि श्रेय वादाच्या लढाईत हा मुद्दा अडगळीत पडला होता.

मात्र आता या मुद्द्याला तीव्रतेचे स्वरूप देऊन या बाबींचा पाठपुरावा करण्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख यांनी पुढाकार घेतलेला असून आज या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या सविस्तर चर्चा करण्यात आली.हा कारखाना सुरू झाल्यास या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुगीचे दिवस येतील. सदर कारखाना सुरू झाल्यास या कारखान्याला या भागातील शेतकरी संपूर्ण सहकार्य करेल अशी हमी माजी मंत्री श्री.संजय देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांना दिली. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना, बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी हा ऊस कारखाना सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. सर्व पक्षीय नेत्यांना आव्हान आहे. की आपण सर्वांनी मिळून आपल्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साथ द्यायची असेल तर हा ऊस कारखाना सुरू करणे अतयंत गरजेचे आहे. यासाठी आज दिनांक ३१ जुलै रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या नागपूर येथील निवासस्थानी जय किसान साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी कारखान्याशी निगडित असलेले सर्व अधिकारी यांचे समक्ष कारखाना सुरू करण्यासंदर्भात विविध बाबींवर चर्चा करून लवकरच कारखाना सुरू करण्याचे सुतोवाच दिले. यावेळी उपस्थित संजय देशमुख,माजी मंत्री.महाराज्य, अँड.राहुल दिनेश ढोरे उपस्थित होते.

साखर आयुक्ताची ही  घेणार भेट

तालुक्यातील बोदे गाव येथील जय किसान साखर कारखाना चालू झाल्यास शेतकऱ्यांसाठी तो एक कल्पतरू ठरेल या प्रांजल इच्छेने हा कारखाना लवकरात लवकर चालू व्हावा याकरिता आज नागपूर येथे गडकरी यांची भेट घेतली. विभागात वाढलेला बेरोजगारीचा प्रश्नही यामुळे काही प्रमाणात मार्गी लागू शकेल व स्थानिक भूमिपुत्र रोजगार निर्मिती होईल. याकरीता हा कारखाना लवकरात लवकर चालू व्हावा यासाठी सर्व राजकीय मतभेद दूर ठेवून प्रयत्न करू व यासंदर्भात लवकर साखर आयुक्ताची भेट घेऊन त्रांत्रिक बाबी दूर करण्याचा प्रयत्न करू..

– संजय देशमुख
( माजी क्रीडा मंत्री, महाराष्ट्र)