माहूर (सरफराज दोसानी)- अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे, आणि या नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करत आहे त्यामुळे आता 302 चा खटला कुणावर दाखल करायचा असा सवाल अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. ते आज दिनांक ३० शनिवार रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी बोलत होते. मुख्यमंत्री हे विरोधकांच्या दौऱ्यावर टीका करत आहेत, ते सोडून त्यांनी शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल याचा विचार करण्याचा सल्ला देखील यावेळी अजितदादांनी दिला आहे.
माहूर तालुक्यातील दत्तमांजरी कुपटी भागाची पाहणी केल्यानंतर विदर्भ मराठवाड्याला छेडून वाहणाऱ्या कुपटी निकट च्या पैनगंगा नदीच्या पुराणे खरडलेल्या शेतीची पाहणी केल्या नंतर ना.अजितदादा पवार यांनी पत्रकारांशी बातचीत करताना पुढे सांगितले की,एक गोष्ट मला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगायची आहे. की, त्यानी त्यांचे काम करावे व आम्हाला आमचे काम करू द्यावे.कारण आम्ही राज्याच्या पूर परिस्थितीचा पाहणी दौरा करतोय त्या दौऱ्या बद्दलच ते चर्चा करत आहेत. त्यापेक्षा त्यांनी त्यांचे काम करावे असा टोला विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी नांदेड जिल्हा अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लागवलाय.दरम्यान आम्ही हा दौरा राजकारणासाठी करत नाहीये,यात त्यांनी राजकारण करू नये ,त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे.कारण अतिवृष्टी होऊन बरेच दिवस झालेत,पिकांचे नुकसान झाले, घरे पडली त्याची 5 हजार रुपये तात्काळ मदत भेटली नाही की, पंचनामेही झाले नाहीयेत.दरम्यान एकनाथ शिंदे तुम्ही सगळीकडे फिरताय,शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय. मग 302 चा गुन्हा कुणावर दाखल करावा ते एकनाथ शिंदेंनी सांगावे असा प्रश्न अजित पवारांनी यावेळी विचारलाय.त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्ये पासून परावृत्त करण्यासाठी त्यांना आत्मविश्वास द्यावा जेणेकरून ते आत्महत्या करणार नाहीत.
बँकेचे कर्ज,शावकारी व गटाच्या कर्जाणे माझ्या पतीने जीवन सपवले साहेब….
माहूर तालुक्यातील पांचुदा येथील विजय शेळके या शेतकऱ्याने काल शुक्रवारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.अजित दादांच्या दोऱ्यात शेतकरी विधवा महिला अर्चना विजय शेळके यांनी कळेवर ताण लेकरू घेऊन साहेब शेतीमधील उभी पिके पाण्याने गेली, बँकेचे कर्ज,शावकारी व गटाच्या कर्जाच्या बोज्याने माझ्या पतीने जीवन सपवले साहेब….असे म्हणून मदती मागणी केली.या वेळी राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार प्रदीप नाईक,माहूर चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी,जिल्हा अध्यक्ष हरिहर भोसिकर यांची उपस्थिती होती.