शेतकऱ्यांना संकटमुक्त करून समृद्धी लाभू दे…. धनंजय मुंडे यांचे श्री रेणुका मातेला साकडे!

माहूर:- मराठवाड्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संकटमुक्त करून समृद्धी लाभू दे असे साकडे राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी माहूर गडावरील आई रेणुका मातेला घातले.
आज दिनांक ३० शनिवार रोजी नांदेड-हिंगोली जिल्हा दौऱ्यावर असताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी श्री क्षेत्र माहूर येथे रेणुका मातेचे दर्शन घेऊन आरती केली.या वेळी मराठवाड्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संकटमुक्त करून समृद्धी लाभू दे, अशी रेणुका मातेच्या चरणी आपण प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.विरोधी पक्ष नेते आजितदादा पवार यांच्या दोऱ्याचा निमित्ताने धनंजय मुंडे हे काल शुक्रवारी रात्रीच माहूर मुक्कामी आले होते.आज शनिवारी सकाळी सात वाजता त्यांनी माहूर गडावर जाऊन आरती केली.दर्शना नंतर संस्थान च्या वतीने मुख्य पुजारी शुभम भोपी यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.या वेळी माजी आमदार प्रदीप नाईक,नगराध्यक्ष फिरोज दोसानी,दिनकर दहिफळे,युवक राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव,युवक चे अध्यक्ष मारोती रेकुलवार,शहराध्यक्ष अमित येवतिकर,प्रा.भगवान राव जोगदंड यांची उपस्थिती होती.