माहूर:- माहूर तालुक्यातील पाचुंदा येथील विजय पिंजाजी शेळके (40) या शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शुक्रवार दिनांक 29 रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
माहूर तालुक्यातील पाचुंदा येथील विजय पिंजाजी शेळके (40) या तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टी मुळे शेतीमधील उभी पिके पाण्यात गेली, पिकाचे नुकसान झाल्याने तीबार पेरणी करण्याची वेळ आली. आधीच बँकेचे दीड लाख रुपये कर्ज, शावकारी व गटाचे उचलले कर्ज जे दर आठवड्याला भरावे लागते, ते कसे फेडावे या विवंचनेत त्याने विषारी औषध प्राशन केले.त्याला तत्काळ माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले,त्या ठिकाणी डॉ.वैजनाथ साठे यांनी प्रथम उपचार करून अधिक उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविले.माहूर पासून पुसद जवळ पडते म्हणून विजय ला पुसद येथील दवाखान्यात नेण्यात आले.त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.